Wednesday, August 28, 2013

चावडी=फेसबुक

शहरीकरणामुळे भारतातील समाजप्रिय समाज चावडीला पारखा झाला होता. तसेच सकाळ ते संध्याकाळ पर्यंत फुल टायम काम करण्याची जबरदस्ती ह्या भांडवलशाही लोकांनी लादली होती. रात्री पण ह्या पुरुष विरोधी सरकारमुळे बायकांना झालेल्या त्यांच्या हक्काच्या जाणिवेचे रुपांतर आता दन्डेलशाहित  झाले आणि शहरात चावडीला पर्याय उभा करणे दुरापास्त झाले होते. कुचाळक्या करणे, दारू पिवून पडणे,  भांडणे करणे,  मिटवणे , पुन्हा भांडणे, राजकारणां वर फालतू गप्पा मारणे, धर्ममार्तंडा सारखे दुसर्याच्या धर्मावर आणि जातीवर चिखलफेक  करणे, एकमेकाला चहा पाण्याला गाडणे ह्या आणि अश्या आयुष्यातल्या अनेक आनंदापासून पुरुष समाज पारखा झाला होता. ह्यामुळे कला, राजकारण, अर्थकारण आणि शृंगारिक साहित्यापासून समाज दूर जातो कि काय ह्याची भीती व्यक्त करायला काही जागरूक विचारवंतानी चालू केली होती. जवळ जवळ तीस वर्षाहून जास्त काळ चालू असलेल्या ह्या अंधार युगातून भारतिय समाज्याला मुक्त करण्यासाठी व चावडीचा हक्क पुन्हा देण्यासाठी मार्क झुकेरबर्ग ह्याला अवतार घ्यावा लागला. आणि त्याने फेसबुक नामक चावडीला जन्म घातला.

ह्या अवताराने गोऱ्या साहेबाच्या  रुपात जन्म घेतल्यामुळे भारतीय विचारसरणी मध्ये  आणि चावडीमध्ये सुद्धा क्रांती आणण्याचे श्रेय हे श्री श्री श्री श्री मार्क यानाचा द्यावे लागेल. स्त्रियांना असलेली चावडी बंदी त्याने उठवली आणि पहिल्यांदाच भारतीय स्त्रिया पण चावडीवर बागडू लागल्या. भारतीय स्त्रिया पण कश्यातच मागे नाहीत ह्याचा प्रत्यय जागोजागी येवू लागला. कसल्याही स्त्रीमुक्तीचे आंदोलन न करता रक्तहीन क्रांती घडविल्याने अहिंसावादी लोक श्री श्री श्री श्री मार्कला शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मागणी करत असल्याचे ऐकिवात आहे. स्त्रीयांनी हि प्रगती  ३३% राखीव जगाशिवाय ५०% साधल्यामुळे प्रगतीसाठी राखीव जागांची खरच गरज आहे काय असे प्रश्न काही समतावादी लोक विचारू लागले आहेत. 

हि स्त्री पुरुष मंडळी या चावडीचा घरी, दारी, ऑफिसात, बागेत, मॉलमध्ये पुरुष, बायको शेजारी असल्याची तमा न बाळगता व बायका, नवरा शेजारी असल्याची तमा न बाळगता चावडीवरच्य सगळ्या म्हणजे सगळ्या गतिविधिचा मनमुराद आनंद लुटत आहेत. तीस वर्षापुरच्या चावडीचा हा खराखुरा वर्चुअल अवतार बघून याच्या निर्माण कर्त्याला पण विश्वास बसत नाही. जेंव्हा गॉडने पहिल्यांदा मानवाला बनविले असेल तेंव्हा  स्वताची पाठ थोपटून घेतली असेल तसेच हा अवतार पण न्हानीची कडी लावून आतल्या आत स्वताची पाठ थोपटून घेतो असे त्याच्या दरबारातील फारफार जवळच्या लोकांनी बाहेर फोडले आहे.

तीस वर्ष्यापुर्वीचीच चावडी अपग्रेडेड रुपात आणल्याविषयी आता कुणालाही शंका उरलेली नाही. ज्यांनी काही प्रश्ने उपस्थित करण्याचा प्रयत्न केला त्यांची तोंडे माती न मिळाल्यामुळे डांबर घालून बंद करण्यात चावडी समर्थकांना येश मिळाले आहे. या चावडीवर सगळं काही जसंच्या तसं होत आहे, एका कोपऱ्यात  चार टाळकी गोळा होवून राजकारणावरून हमरीतुमरीवर येत आहेत, काही लोक देवळाच्या जीर्णोद्धारासाठी तर काही लोक तामाश्यासाठी वर्गणी मागत आहेत, दोन तीन तरुण पोरं कडेला उभा राहून चावडीला खेटुन असलेल्या एका घरातील सुंदर पोरीवर लाईन मारत आहेत, सकाळी सातच वाजता एखादा कार्यकर्ता दारू पिवून लोळत अख्या गावाला शिव्या देत आहे, काही लोक कुणाला तरी फौजदारी करण्याची धमकी देत आहेत, तेवढ्यात दोन तीन सुवासिनीचा घोळका येताना दिसताच काही लोक आम्ही किती सभ्य आहोत  हे दाखवण्यासाठी पट्कन त्यांना जागा देवून त्यांच्या तोंडाकडे न बघण्याचे सोंग करत आहेत, कुणी लोक जवळच असलेल्या सलुनमधून पंधरा दिवसा नंतर केलेली दाढी दाखवायचा प्रयत्न करत आहे, काही लोक काम बघत आहेत, काही लोक पैस्याचा व्हावहार करत आहेत.

तरीपण कुणाचेही कुणाला काही देणेघेणे नाही. चावडीवर ह्या सगळ्या गतिविधि एकसाथ होत असताना   प्रेत्येक जण आपले आपले स्वतंत्र अस्तित्व सांभाळून आहे.  इथे जोपर्यंत लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होत नाही तोपर्यंत काहीपण करण्याची परवानगी आहे. त्यामुळे फेसबुकरुपी  चावडीवर पण कुणाला फुटु काढून टाकू वाटत असेल, एखाद्याला कविता/साहित्य लिहू वाटत असेल, फिलोसोफी झाडू वाटत असेल, धर्मावर आणि देशप्रेमावर प्रवचन द्यावे वाटत असेल, दुस्ती, प्रेम (लिमिटेड ) करावे वाटत असेल बिन्दास्त करा मित्रानो चावडी आपलीच असा.

फक्त निर्माण कर्त्याचा उपकार सदैव ध्यानात ठेवा!






No comments:

Post a Comment