Wednesday, August 28, 2013

चावडी=फेसबुक

शहरीकरणामुळे भारतातील समाजप्रिय समाज चावडीला पारखा झाला होता. तसेच सकाळ ते संध्याकाळ पर्यंत फुल टायम काम करण्याची जबरदस्ती ह्या भांडवलशाही लोकांनी लादली होती. रात्री पण ह्या पुरुष विरोधी सरकारमुळे बायकांना झालेल्या त्यांच्या हक्काच्या जाणिवेचे रुपांतर आता दन्डेलशाहित  झाले आणि शहरात चावडीला पर्याय उभा करणे दुरापास्त झाले होते. कुचाळक्या करणे, दारू पिवून पडणे,  भांडणे करणे,  मिटवणे , पुन्हा भांडणे, राजकारणां वर फालतू गप्पा मारणे, धर्ममार्तंडा सारखे दुसर्याच्या धर्मावर आणि जातीवर चिखलफेक  करणे, एकमेकाला चहा पाण्याला गाडणे ह्या आणि अश्या आयुष्यातल्या अनेक आनंदापासून पुरुष समाज पारखा झाला होता. ह्यामुळे कला, राजकारण, अर्थकारण आणि शृंगारिक साहित्यापासून समाज दूर जातो कि काय ह्याची भीती व्यक्त करायला काही जागरूक विचारवंतानी चालू केली होती. जवळ जवळ तीस वर्षाहून जास्त काळ चालू असलेल्या ह्या अंधार युगातून भारतिय समाज्याला मुक्त करण्यासाठी व चावडीचा हक्क पुन्हा देण्यासाठी मार्क झुकेरबर्ग ह्याला अवतार घ्यावा लागला. आणि त्याने फेसबुक नामक चावडीला जन्म घातला.

ह्या अवताराने गोऱ्या साहेबाच्या  रुपात जन्म घेतल्यामुळे भारतीय विचारसरणी मध्ये  आणि चावडीमध्ये सुद्धा क्रांती आणण्याचे श्रेय हे श्री श्री श्री श्री मार्क यानाचा द्यावे लागेल. स्त्रियांना असलेली चावडी बंदी त्याने उठवली आणि पहिल्यांदाच भारतीय स्त्रिया पण चावडीवर बागडू लागल्या. भारतीय स्त्रिया पण कश्यातच मागे नाहीत ह्याचा प्रत्यय जागोजागी येवू लागला. कसल्याही स्त्रीमुक्तीचे आंदोलन न करता रक्तहीन क्रांती घडविल्याने अहिंसावादी लोक श्री श्री श्री श्री मार्कला शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मागणी करत असल्याचे ऐकिवात आहे. स्त्रीयांनी हि प्रगती  ३३% राखीव जगाशिवाय ५०% साधल्यामुळे प्रगतीसाठी राखीव जागांची खरच गरज आहे काय असे प्रश्न काही समतावादी लोक विचारू लागले आहेत. 

हि स्त्री पुरुष मंडळी या चावडीचा घरी, दारी, ऑफिसात, बागेत, मॉलमध्ये पुरुष, बायको शेजारी असल्याची तमा न बाळगता व बायका, नवरा शेजारी असल्याची तमा न बाळगता चावडीवरच्य सगळ्या म्हणजे सगळ्या गतिविधिचा मनमुराद आनंद लुटत आहेत. तीस वर्षापुरच्या चावडीचा हा खराखुरा वर्चुअल अवतार बघून याच्या निर्माण कर्त्याला पण विश्वास बसत नाही. जेंव्हा गॉडने पहिल्यांदा मानवाला बनविले असेल तेंव्हा  स्वताची पाठ थोपटून घेतली असेल तसेच हा अवतार पण न्हानीची कडी लावून आतल्या आत स्वताची पाठ थोपटून घेतो असे त्याच्या दरबारातील फारफार जवळच्या लोकांनी बाहेर फोडले आहे.

तीस वर्ष्यापुर्वीचीच चावडी अपग्रेडेड रुपात आणल्याविषयी आता कुणालाही शंका उरलेली नाही. ज्यांनी काही प्रश्ने उपस्थित करण्याचा प्रयत्न केला त्यांची तोंडे माती न मिळाल्यामुळे डांबर घालून बंद करण्यात चावडी समर्थकांना येश मिळाले आहे. या चावडीवर सगळं काही जसंच्या तसं होत आहे, एका कोपऱ्यात  चार टाळकी गोळा होवून राजकारणावरून हमरीतुमरीवर येत आहेत, काही लोक देवळाच्या जीर्णोद्धारासाठी तर काही लोक तामाश्यासाठी वर्गणी मागत आहेत, दोन तीन तरुण पोरं कडेला उभा राहून चावडीला खेटुन असलेल्या एका घरातील सुंदर पोरीवर लाईन मारत आहेत, सकाळी सातच वाजता एखादा कार्यकर्ता दारू पिवून लोळत अख्या गावाला शिव्या देत आहे, काही लोक कुणाला तरी फौजदारी करण्याची धमकी देत आहेत, तेवढ्यात दोन तीन सुवासिनीचा घोळका येताना दिसताच काही लोक आम्ही किती सभ्य आहोत  हे दाखवण्यासाठी पट्कन त्यांना जागा देवून त्यांच्या तोंडाकडे न बघण्याचे सोंग करत आहेत, कुणी लोक जवळच असलेल्या सलुनमधून पंधरा दिवसा नंतर केलेली दाढी दाखवायचा प्रयत्न करत आहे, काही लोक काम बघत आहेत, काही लोक पैस्याचा व्हावहार करत आहेत.

तरीपण कुणाचेही कुणाला काही देणेघेणे नाही. चावडीवर ह्या सगळ्या गतिविधि एकसाथ होत असताना   प्रेत्येक जण आपले आपले स्वतंत्र अस्तित्व सांभाळून आहे.  इथे जोपर्यंत लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होत नाही तोपर्यंत काहीपण करण्याची परवानगी आहे. त्यामुळे फेसबुकरुपी  चावडीवर पण कुणाला फुटु काढून टाकू वाटत असेल, एखाद्याला कविता/साहित्य लिहू वाटत असेल, फिलोसोफी झाडू वाटत असेल, धर्मावर आणि देशप्रेमावर प्रवचन द्यावे वाटत असेल, दुस्ती, प्रेम (लिमिटेड ) करावे वाटत असेल बिन्दास्त करा मित्रानो चावडी आपलीच असा.

फक्त निर्माण कर्त्याचा उपकार सदैव ध्यानात ठेवा!






Tuesday, August 27, 2013

Manmohansing as a leader

१९९१ साली खुले आर्थिक धोरण स्वीकारल्या नंतर  सरदार मनमोहनसिंग यांची जी  जीनिअस म्हणून स्तुती झाली ती संपूर्णता चुकीची होति हे रुपायाची स्थिती, बेरोजगारी, आर्थिक वाढीचा दर, पेट्रोल -डिझेलचे  दर, घराचे भाव, शिक्षण क्षेत्रातील भाववाढ,आणि वरचे वर होणार्या घोटाळ्यामुळे सिद्ध झाले आहे. पी व्ही नार्सिम्हराव सारख्या दूरदर्शी नेत्याच्या नेतृत्वाखाली तयार केलेली धोरणे एका माजी नोकरशहाणे अदबीने राबविली त्याची फळे भारताला त्या दशकात मिळाली. पण जेव्हा हाच नोकरशहा पंतप्रधान बनतो आणि दुसऱ्या  सर्वसाधारण नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम  करतो त्यावेळी त्याच्या मधील मर्यादा स्पष्ट होतात. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आणि मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी अर्थशास्त्री आणि कारकुनाची गरज नसते. गरज असते ती मजबूत आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याची. त्याची तर उणीव गेले दहा वर्ष भासत आहे.

पण भारताचे दुद्दैव येवढं भयंकर आहे कि याला पर्याय पण फुफुट्यातून  उटुन आगीत पडण्यासारखा आहे.

Monday, August 26, 2013

पुन्हा गरिबी हटाव खांग्रेस

गरिबी हटावचा आवडता नारा निवडणुकीसाठी कायम राहावा म्हणून गरिबी हटावन्यापेक्ष्या ती राहिलेलीच अधिक सोयीचे आहे हे देश्याच्या पहिल्या आणि राज्यकर्त्या कुटुंबाने वोळखलेले आहे. त्यामुळे इथून पुढे गरिबी टिकवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले जातिल. ८०% लोकांना स्वस्तात अन्नधान्य पुरवण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देवून गरिबांच्या नावाखाली वितरण व्यवस्थेतील लोकांचा गबर गंड होण्याचा मार्ग शोधला आहे.  हेच लोक पुढील प्रत्येक निवडणुकीत सत्तेतील पक्ष्याला मदत करतिल. जवळ जवळ फुकटच अन्न धन्य मिळत असल्यामुळे आताच मिळत नसलेले शेतमजूर काही दिवसांनी मिळणारच नाहीत. सरकारी धान्य विपुल प्रमाणात मिळत असल्यामुळे बाजारातील धान्याची किमत कमीच राहणार, सरकारला हा खर्च असह्य होणार असल्यामुळे बाजामुल्या कमीत कमी कसे राहील याची काळजी सरकार तर्फे घेतली जाइल.

आज बाजारात  ज्वारीला दोन हजार आणि तुरी तीन हजार रुपये मिळणारा भाव नंतर किती होईल याचा विचार पण करवत नाही. आणि कमी नाही झाला तरी वाढणार पण नक्कीच नाही. गरिबांना गरीब ठेवून आणि शेतकर्यांना पिळून घेवून हे सरकार कुणाचे भले करणार आहे?. या विधेयकासाठी चार लाख कोटीचा भर सोसणारे हे सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून काय घंटा करत आहे काय? शेतकरी आणि एकूणच देश विरोधी विधेयकाचा जाहीर जाहीर निषेध.



हागवण

वैशाखातलं असह्य ऊन घेवून आलेला हा पण नेहमीसारखाच एन नवीन दिवस, नवीन म्हणजे फक्त क्यालेण्डरवर एक आगावु तारीख, बाकी सगळं काल  परवाचंच किंवा इथल्या कामगारांच्या पाचवीलाच पुजलेलं. नऊ वाजल्यापासूनच तळपायला चालू केलेल्या उन्हामुळे आकरा वाजेपर्यंत एके काळी जवान असलेल्या पण अनेकांनी पिळून आणि निचडुन घेवून बेवारस सोडून दिलेल्या रांडेसारखी अवस्था झालेल्या साखर कारखान्यावरचं वातावरण जास्तच भकास, उदास आणि भयानक शांत वाटत होतं. वृध्द लिंबाच्या झाडाच्या आडोश्याला गेली वीस वर्ष चालू असलेल्या आंधळ्या तात्याच्या घर वजा हॉटेलच्या फाटक्या तुटक्या छताखाली तीच दररोजची चारपाच मंडळी हा पण दिवस लोटण्याची वाट बघत होती. आंधळा तात्या तिथल्या मंडळीना, "आता तीन चार तास झालं, आता तरी तुमाला च्या प्यावाच लागल" अशी विनंती वजा धमकी देत होता. पण हि मंडळी नुसतंच रांजणातलं थंड पाणी पिवून उन्हाच्या झळयापासून बरं वाटावं म्हणून तोंडावर  मारत परत परत तीच पेपरची पानं खुर्च्यावर आणि बाकड्यावर वाकडं तिकडं होत वाचत होती. कारखान्याच्या उजाड केलेल्या माळरानावर ह्या हॉटेलातील चार पाच मंडळी आणि  लागुनच असलेल्या डांबरी रस्त्यावरून जाणारी एखादी जीप, एसटी किंवा सायकल त्या शांततेला छेद देवून जात. प्रत्येक थांबणाऱ्या वाहनकडं तात्या आशाळभूत नजरेने पाहायचा. एखादा तरी चहा जाईलच! पण तिथल्या मंडळीना चार पाच गीऱ्हांइके  एकदम आली तर आपल्याला उठावं  लागतं कि काय हि भीती पण कायमचीच मनात.

तिथूनच दोन तीन फर्लांगवर असणाऱ्या आणि  एके काळी हजारो लोकांची पोटं भरणाऱ्या कारखान्याच्या बंद पडलेल्या चीमनिकडं पहावत नाही. कसलंही वर्तमान नसलेल्या कामगारांच्या आणि त्यांच्या पोरा बाळांच्या जीन्दग्या भयानक भविष्यकाळाची चाहूल लागल्यमुळं जास्तच खचून गेल्या आहेत. प्रत्येक ढगाला असनारी सोनेरी किंवा चंदेरी किनार सुद्धा हितल्या शोषणकर्त्यानी काढून घेतलिय याची जाणीव इथल्या वाऱ्यावर संसार पाडलेल्या कामगारांना खूप अगोदरच झालीय. आपली पोरं बाळं शिक्षणा अभावी बरबाद होताना डोळ्यासमोर बघण्याची शिक्ष्या आम्हाला नियतीनं का दिली आसंल, अशी चर्चा काही भोळी भाबडी कामगारं तात्याच्या हॉटेलात नाहीतर ईट्ठल रुक्मिणीच्या देवळात बसून करत असतात. 

घरी बसून काय करायचं म्हणून कामगार कारखान्यात जातच आहेत.  पंख्यांचा खट-खट-खट असा आवाज, बाजूला ठेवलेला पाण्याचा डेरा, वरती भिंतीवर असलेले साखर सम्राटांचे फोटो आणि त्यांच्या शेजारी सगळ्यात मोठ्या आकारात जाणत्या राजाचा १९७७ सालचा फेटेधारी गोबऱ्या  गालाचा हसतानाचा फोटो. गेल्या अनेक महिन्यापासून गांजून गेलेल्या कामगारां मुळे सुतकी कळा आलेल्या त्या हाफिसात ते गोबऱ्या गालाचे हास्य खूपच विकृत वाटत होते. काम नाही, पगार नाही म्हणू कामगारांच्या चाललेल्या गप्पा एकदम शांत होतात त्या अचानक आलेल्या लहान मुलाच्या आर्त हाकेने.

"बाबा"
बाबाच्या पाठोपाठ आपोआप बाकीचे लोक पण उठतात आणि त्या मुलाकडे काळजी आणि दया युक्त नजरेने बघायला लागतात. 

"बाबा मला हागवण लागलीय, सकाळपासून फोक सुट्ल्यात, आई मनली, कारखान्यातून तुम्हाला घेवून दवाखान्यात जा, सकाळपासून सात वेळा झालीय"

असं बोलताना त्याचा आवाज संपला आनि तो रडु लागला. बापानं खांद्यावरच रुमाल काढला आणि पोराचंपण आणि स्वतःचं  पण डोळं  पुसलं. त्या मुलाचा अवतार बघून ऑफिसमधल्या बऱ्याच लोकांना कंठ आवरण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. पोराला स्टुलावर बसवून, कुनाकडंच पैसे मिळणार नाहीत हे माहित असताना सगळ्याकडे फक्त आशाळभूत नजरा फिरवल्या. लोकांच्या नजरेतच उत्तर कळले होते. त्यांचा तरी काय दोष, सगळे लोक सारख्याच परिस्थितीतून जात होते. हे दृष्या नेहमीचंच झालं होतं, अनेक वेळा तर लोकांच्या मयतीला सुद्धा पैसे नसायचे, वर्गणी करून लाकडं गोळा करावी लागायची.  इथं पण ह्या लहान मुलाकड बघून चू चू चू करण्या शिवाय कोणीच काही करू शकत नव्ह्ते.

स्वतःच्या खांद्यावरचा रुमाल पोराच्या डोक्याला बांधून बाप पोराला दवाखान्यात घेवून निघाला. तीन किलोमिटर चालत गेल्यानंतर गावात दवाखाना. रखरखनाऱ्या उन्हात आनवानि चालताना पायाला बसणारे चटके पोरगं आता दवाखान्यात जावून आपुन निट होणार या भावनेने विसरलं होतं. चढ उताराची डांबरी सडक चढुन उतरून घामेजलेले बापलेक जेव्हा सरकारी दवाखान्यात पोचले तेव्हा पाच मिनिट उशीर झाला म्हणून सिस्टर ने केस पेपर काढून  दिला नाही. बापाला भोवळ यायची पण त्याने पोराकडे बघितले आणि सावरून घेतलं. पोराला जरा जरा कळू लागलं होतं. तिथून तडक RMP आणि खूपच प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरकडे हे बाप लेक मोठ्या आशेने गेले. आता चार नंबर संपल्या नंतर आपलाच नंबर असं बापानं पोराला सांगितलं आणि त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. बाप पोटात आलेला गोळा दाबायचा प्रयत्न करत ठरवत होता कि इंजेक्शन दिल्यावाशिवाय सांगायचंच नाही कि आमच्याकडे पैसे नाहीत. डॉक्टरांनी बोलाविले आणि विचारले काय झाले. पोरगं जमेल तेवढी टाकत एकवटून म्हणालं , "हागवण लागलीय, सकाळपासून फोक सुट्ल्यात थांबतच न्हायत"
डॉक्टर तपासणार तेवढ्यात बापाला राहवलं नाही आणि म्हणालाच , "डॉक्टर साहेब आमच्याकडं  पैसे नाहीत पण मी आणून देईन" हे ऐकताच डॉक्टर साहेबांनी हिंजाडून पोराला ढकलून दिलं आणि म्हणाले , : न्हाय न्हाय तसलं काय नाही, पैसे घेवून या, संतोष, पुढच्याला पाठवरे"

अपमानित झालेला आणि त्याहीपेकश्या आपण पोराला साधं दवाखान्यात दाखवू शकत नाही याची जाणीव झालेल्या जगातल्या कोणत्यापण बापाची जी अवस्था होईल तीच अवस्था यापन बापाची झाली.  रस्त्याच्या  कडेच्या एका टपरीवजा हॉटेलातून दोन दोन गलास पाणी पिवून पुन्हा तोच चढ उताराचा रस्ता बापलेक गुमान चालू लागली. दोघांच्या पण मनात वेगवेगळी चक्र चालू असताना बापानं विचारलं,  "आरं पण तुला संडास नाही आली आजून लय वेळ झालं? "

"न्हाय आली, पण माझं पाय लय दुकाया लागल्यातंय"
"झालं  आता तेवढा चढ चढला कि आलंच आपलं  घर"




Monday, August 19, 2013

डान्स बार उर्फ स्वर्ग !

आम्ही मुंबईला जायला आणि डान्स बार वर आबा पाटलांनी बंदी आणल्याची दुख;द बातमी कानावर पडायला गाट पडली. गेल्या दहा वर्षापासून  बाळगलेली हि पण अजून एक महात्वाकांक्ष्या कधीच पूर्ण होणार नाही म्हणून अतीव दुख झाले. आता नेहमीप्रमाणे या पण दुक्खावर आक्शीर उतारा म्हणून सांच्याला  म्हाताऱ्या साधूला जवळ घेवून बसायची संधी मिळणार त्यामुळे आतल्या मनाने आतल्या आतच बागडायला पण चालू केलं होतं. या दुखाचं  वोझं घेवूनच ट्याक्सित बसलो अन भैय्याला ऑर्डर दिली "एल्फ़िन्सटन रोड".  जसजसं हे एल्फिन्स्टन रोड जवळ येत व्हतं तसं माझ्या काळजाचं  ठोकं वाढायला चालू झालं.

मी, "भैया आप रस्ता चूक गये  है, इस इलाके मी मेरा  दोस्त नही रह सकता"
भैया," नाही ना जी, येही ही है ना जी आपका का पता, सायोनारा बिल्डींग तीस माले कि हि है"

खानदेश्यातल्या एका गावातल्या आपल्या दोस्ताने अगरवाल, खटोडिया, गांधी, गिडवानी आश्या नावाच्या जमाती राहायच्या, त्या ठिकाणी फ़्ल्याट घेतलाय हे बघून ह्या मऱ्हाठी माणसाचा भरून आलेला उर आसपासच्या टपरी वाल्या, चहा वाल्या, ट्याक्सिवाल्या लोकांच्या नजरेतून सुटला नसावा. मी पिशवी घेवून ट्याक्सीतून उतरून त्या सायोनाराचं मजलं मोजायला चालू केलं आणि आपल्याकडून काय तरी चुकत आहे याची जाणीव होताच सरळ होवून चालू लागलो. आपलि भाषाच नाही तर हावभावाच पण साला आसं कि कुठं जरी गेलं तरी लोकं विचारतात "उस्मानाबादचा का ? ".
चालताना मला उगीचच भास झाला कि हे सगळे लोक एकमेकाला " लो और एक घाटी आ गया"  असं म्हणत आहेत.

गेटच्या दरवाज्यातून दोस्त घेवून जायला लागला तर वाचमनने उठुन सलाम ठोकला एखादा माणूस गोंधळून गेला असता पण मला पण आता थोडीशी सवय झालीय, मी जास्तच तोंड फुगावलं अन त्याच्याकडं दुर्लक्ष्य करून पुढं चालू लागलो. आपला वट वाढवायची हि पण एक स्टाइल असते. नाहीतर अगोदर मी अश्या वेळेला ओशाळल्यागत हसायचो मग तो वाच्मन आपली पुति ओळखून सोडायचा.

घरात माफ करा फ़्ल्याट मध्ये शिरताच एक  खूपच सुंदर अशी बुद्ध प्रतिमा दर्शनीच दिसली, मी तिथंच थबकलो आणि मित्राकडं प्रश्नार्थक नजरेनं बघितलं.
तो, " सतरा हजार रुपयांची!
मी, " आरे वाह मूर्ती तर सुंदर आणि छानच आहे पण तुझ्या घरी बुद्ध ?
तो , " आरे बाबा तुला कळणार नाही आम्ही  "इण्टलेक्च्वल" मध्ये मोडतो आता,  सुंदर आणि महागडी बुद्ध प्रतिमा घरी असल्याशिवाय ते स्टेटस मिळत नाही.

छ्यान छ्यान !

मी, "आरे पण माझं दुखः घालवायचं काय तर  कर,  थेरडा साधू तर पाहिजेच पाहिजे.
तो, " आरे मित्रा थेरडा साधू विसर आता, तुला मास्तरची आणलीय, दुक्खाचा किती आनंद भोगायचा तेवढा भोग! पण हि कोरीच हाणायची असते, हा घे बारका पिल्लू कप, सलग तीन कप, खप, खप, खप हाणू दोघं मिळुन. आसं छातीत जळा जळा करत गेलं कि  स्वर्गाच्या रस्त्यावर असल्याचा भास होतो आणि खाली आठच मिनिटात तुला शेट्टीच्या स्वर्गात पण घेवून जातो.

साला अजून कारा असल्यामुळं ह्याला काय पण परवडतं !

स्वर्गाच्या रस्त्याचा आनंद उपभोगत आम्ही सातच मिनिटात सायोनाराच्या खालीच असलेल्या शेट्टीच्या स्वर्गात दाखल.

साडेसातलाच गेल्यामुळे पहिले ग्राहक बनण्याचा मान आम्हालाच मिळाला होता. आतलं वातावरण म्हणजे साक्ष्यात स्वर्गाची कल्पना केल्या सारखं नव्हतं पण कमी पण नव्हतं.









Tuesday, August 13, 2013

मराठी साहित्य संमेलनाचा हेतू आणि उद्देश

मराठी साहित्य संमेलनाचा हेतू आणि उद्देश काय असावेत यावर सासवड येथे होत असणाऱ्या अ. भा. सा. संमेलनाच्या अध्यक्ष्यपदाचे उमेदवार श्री संजय सोनवणी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी उचललेले मुद्दे आणि माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या माणसाच्या अपेक्श्या मध्ये खूपच साधर्म्य आढळून आले. याच मुद्द्याचा उहापोह आतापर्यंतच्या साहित्य संमेलनामध्ये झाला असता आणि त्यावर खरेच कृती पण झाली असती तर या संम्मेलनाची कुणी करदात्याच्या पैस्यावर भरलेली लेखकांची आणि कवींची जत्रा म्हणून हेटाळणी केली नसती.

१. आताचे संमेलन हे विशिष्ट सामाज्याचेच प्रतिनिधित्व करते म्हणून बाकी बहुजन समाज्यातील लोकांना स्वतंत्र साहित्य संमेलने घेणे भाग पडते. सर्व विभागांना, समाज्याला, संस्कृतींना, बोली भाषांना ह्यात स्थान मिळावे म्हणून प्रयत्न करणे

२. ह्या संमेलनात आणि महाराष्ट्रभर गावामध्ये आणि लहान शहरामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्रे घडवून आणून त्या त्या भागातील विद्यार्थ्यांना आणि लोकांना बोलण्याची संधी देणे. तेच तेच लोक बोलत असल्याने नवीन कल्पनांचा आणि विषयांचा अभाव निर्माण झाल्याचा भास होत आहे. पण ते खरे नाही , कारण नवीन विषय आणि कल्पना खूप आहेत पण काही लोक त्या पुढे येवू नये म्हणून काम करत आहे.

२. खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या जगामध्ये जिथे समाज व्यवस्था हि बाजार व्यवस्था झाली आहे व नागरिक हे नागरिक नसून गिऱ्हाईक झाले आहेत अश्या वेळी मराठी भाषा, साहित्य आणि माणूस फक्त टिकून न राहता जिंकून पुढे कसा जाईल यावर उपाय शोधणे.

३. मराठी मध्ये दर्जेदार साहित्य निर्माण होण्यासाठी व जगातील उच्च साहित्यामध्ये मराठी साहित्याला स्थान मिळवून द्यायचे असेल तर उदयोन्मुख लेखकांना प्रोत्साहित करणे. म्हणजे एका जागी साचलेले पाणी वाहते होईल.

३. शिक्षणाचे बाजारीकरण आणि वरचे वर महागडे आणि गरीबाच्या अवाक्यातून दूर जाणारे शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी सरकारवर दबाव आणने.

या आणि अश्या इतर अनेक महत्वाच्या विषय उचलून संजय सोनवणी हे साहित्य संमेलनाची निवडणूक लढत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आमच्या लाख लाख शुभेछ्या.
आजच्या श्री संजय सोनवणी यांच्या वाढदिनादिवशी त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभो हीच सदिछ्या!

Sunday, August 11, 2013

दहशतवाद आणि मी

  1. माझ्याकडे जर कोणी नेहमीच संशयित नजरेने बघत असेल, मला आणि माझ्या जातीला आमची देशभक्ती पुन्हा पुन्हा सिद्ध करून बहुसंख्य लोकांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागत असेल, आमची प्रार्थना स्थळे उघडपणे पोलिस बंदोबस्तात पाडली जात असतील आणि माझ्या जातीतील निष्पाप तरुणांना काही दोष नसताना दोन दोन वर्ष तुरुंगात सडावे लागत असेल आणि खरे गुन्हेगार मोकाट सुटत असतील. तर होय पहिला अतिरेकी मीच होईल.

शरद पवार -दहशतवाद

  1. फेसबुकवर कालपासून शरद पवारांचा निषेध करणारे लेख पोस्ट वाचत होतो. मी भाषण ऐकले नव्हते त्यामुळे प्रतिक्रिया देणे योग्य वाटले नाहि. पण आता ते भाषण ऐकले आणि शरद पवार यांच्याविषयीचा माझा आदर द्विगुणीत झाला. नेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे शरद पवार. टीव्ही वर आणि फेसबुक पवार फोबिया झालेल्या ज्ञांनी लोकांनी आवई उठवायला चालू केलि कि शरद पवार यांनी निवडणुकीमुळे इशरत जहा या अतिरेकी मुलीच्या कारवाईचे ...समर्थन केले.
    काही लोक भडकावू फोटो टाकून शरद्या कसा देशद्रोही आहे याचे दाखले देवू लागले. यातले सगळेच लोक काही भावनेने वाहत गेले कार्यकर्ते नाहीत तर स्वताला ज्ञानी समजणारे टीव्ही पत्रकार, बुद्धिवादी लोक याचा हेतुपुरस्पर अपप्रचार करणारे आहेत. त्यांना माहित आहे शरद पवारांना काय म्हणायचे आहे पण तेच नेमके जणते पर्यंत पोचू नये आणि आपली पोळी भाजून निघावी हाच त्यांचा हेतू आहे. त्यांना २०१४ च्या विषानुने झपाटले आहे.

    शरद पवार यांनी असे म्हटले आहे कि मुस्लिम समाज्यातील मुलाना त्यांनी शुक्रवारी त्यांच्याच मशिदीत बॉम्ब स्पोट केला म्हणून पकडले आणि दोन वर्ष तुरुंगात सडवले. पण अतिरेकी वेगळेच निघाले ह्या आणि अस्य घटनांनी पेटून उठुन एखादा अतिरेकी झाला तर या सगळ्या समाज्याला दोष न देता आपण हा प्रशासकीय व्यवस्थेचा (system ) दोष मानून ती सुधरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, प्रश्नाच्या मुळाशी जायला पाहिजे वरवरची मलमपट्टी कायम स्वरूपी इलाज होणार नाही.
    इशरत या संध्याकाळी प्रियकराला भेटायला गेलेल्या मुलीला सकाळी रस्त्यावर अजून दोघासोबत उभा करून गोळ्या घालून मारले जाते. खरच आपण कायद्याच्या राज्यात राहत आहोत का?

    उद्या पोलिस आपल्या घरी आले आणि म्हणाले कि तुम्हाला खुनाच्या संशयाखाली अटक होत आहे आणि दुसऱ्या दिवशी गोळ्या घालून मारले आणि सांगितले कि हा खुनी होता आणि दुसरा खून करण्याच्या तयारीत होता म्हणून मारले तर हा न्याय होईल का? . मग इथे तर वैयक्तिक प्रश्न नाही तर सामाज्याचा आणि देशाचा आहे. हिंदू वर अतिरेकी असल्याचा आरोप असलेल्यासाठी मानवी हक्काची आर्त हाक मारताना काही लोक दिसतात, हेच लोक त्या १७ निर्दोष तरुणांच्या मानवी हक्कासाठी सुद्धा पुढे आले असते ते सर्वात मोठे देशप्रेमी ठरले असते. पण असे होत नाही


Tuesday, August 6, 2013

झोटिंग

भर दुपारचं  लाही लाही करणाऱ्या  उनात फाट्यावर टंग कन घंटी वाजली अन कनडक्टर म्हणाला, ये$$$$ उतर पोरा$$$$$ आलं तुझं गाव. आतून कधीकाळी पोपटी रंगाचा आणि आता पानाच्या थुंकीने तांबड्या रंगासारखा दिसणारा दरवाजा उघडुन, खांदयावरची  पिशवी सांभाळत उतरलो.  मागून खाट्ट आवाजानंतर "हं राईट " अस्या  कनडक्टरच्या ईश्याऱ्याबरोबर  त्या फाट्यावरच्या अंगावर येणाऱ्या शांततेला उभं आडवं चिरत एसटी निघून गेली. मागे उरली ती गावच्या विरुद्ध दिशेला असलेली उंच पाण्याची टाकी, फाट्यावर कधीतरी निज्यामाच्या काळापासून जमिनीत रोवून ठेवलेला रांजण ज्यावर पंजा, चरखा आणि बैलगाडीची चुन्याने काढलेलि  चित्रे,   रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाकड्या तिकड्या वाढलेल्या आणि बुडावर तपकिरी आणि पांढरा रंग मिरवणाऱ्या बाभळी आणि  प्रचंड उडालेल्या धुळीतून विस्तीर्ण काळ्या रानात रस्त्याच्या दुतर्फा वाटसरुंची वाट बघत शांत पडलेल्या पायवाटा. यातील काही वाटा गावाकडे जाणाऱ्या आणि काही वाटा रानातच दूरपर्यंत जावून नंतर छोट्या छोट्या होत हरवत जाणाऱ्या.

ह्या रानातच हरवणाऱ्या वाटांचं मला नेहमीच कौतुक वाटायचं आणि भीती पण.  चुकून गावाकडे जायची वाट सोडुन एखादी रानातील वाट पकडली तर.  बापरे ! ह्या रानातल्या बाभळीवर आणि लिंबाच्या झाडावर भुतं राहतात हे मला लहानपणीपासून माहित आहे. कुणी एका धर्मु आण्णाने धोतराने फास लावून घेतलेलं झाड, एखाद्या बाईने सासुरवासाला कंटाळून बाभळीच्या झाडाला घेतलेली फाशी तर एखाद्या बाळातिन बाईला तिच्या सासरच्या रानातच सौन्दडिच्या झाडाखाली जाळलं होतं याची लहानपणीच मिळालेली पक्की माहिती. हि रानात राहणारी झाडे म्हणजे भुताची घरे आहेत. होय तेच ते लांब दिसणारे जुने चिंचेचं झाड, त्या चिंचेवर राहणाऱ्या झोटिंग  बाबाला वश करण्यासाठी गावातील एक बाई दर अमुशेला आणि पूर्णिमेला नागड्या अंगाने पुजायला जायची आन एकशे आठ  फेऱ्या मारायची. एके दिवशी गावात बोबाटा झाला अन सगळे गाव त्या दिशेने पळाले. त्यात त्या बाईचा नवरा आणि सात वर्षाचा पोरगा पण होता. आपल्या आईच्या अंगावर कापडं  का नाहीतीरं बा असं पोरानं विचारायच्या आतच  काळी जादू करणाऱ्या बाइला सगळा गाव दगडं मारू लागला. पण पहिला दगड त्याच्या बानंच मारला होता. त्या दगडांच्या आणि लोकांच्या किंचाळण्याच्या आवाजात "माज्या आईला मारू नका वो$$$$$$$$$$ हा त्या चिमुरड्याच आवाज रानातच विरून गेला" सहा महिन्यानं त्या पोराचा बाप पण येड लागून मेला. त्या पोराला पण येड लागलं व्हतं म्हणे पण त्याच्या आजीनं झोटिंग बाबाला नवस बोलून थोडं तरी निट करून घेतलं. तोच भांबडा आण्णा. तो गावात कुणाला पण  दगड मारू शकतो, त्याला झोटिंग बाबाचा आणि त्याच्या आईचा आशीर्वादय . त्याला जर कुणी मारले तर तो चिंचेच्या झाडाखाली जावून आपल्या आईला आणि झोटिंग बाबाला सांगतो अन मग त्या मारणाऱ्या माणसाला पण येड लागतं. गावात गेल्यावर त्याच्या पासून लांबच राहायला पाहिजे.

ह्या भुतांच्या आणि अनेक नागांनी आपली लांबी, लांबच लांब वाढवून संपूर्ण रानात पायवाटांच्या रुपाने  पसरवलेल्या जाळ्यात अडकून पडण्याच्या भीतीवर गावाकडं जाण्याच्या तगमगिने मात केली. फाट्यावर चालू होवून अनेक दिशेला जाणाऱ्या गुंतागुंतीच्या अनेक पायावाटापैकी एक पायवाट धरून सरासरा चालत आणि गाणं म्हणत निघालो. चालताना फक्त लांब दिसणाऱ्या चिंचेकड बघायचं नाही हे ठरवल्यामुळं तिकडं जास्तच लक्ष्य जात व्हतं. एकदा आज्जीनं सांगितला व्हतं कि "झोटिंग" बारक्या पोरांना काहीच करीत नसतं पण आता मी थोडा  मोठा झाल्यासारखा वाटत होतो. त्यामुळं जास्तच भीती वाटुन चालण्याचा वेग वाढू लागला. एकदा सरोवर ओलांडल्यावर झोटिंगचा इलाका संपतो म्हणून जो जोरात लक्ष्मिआयचं नाव घेवून पळालो तो सरोवर म्हणण्याच्या लायकीचा नसणारा छोटासा कोरडी वाळू असलेला ओढा ओलांडूनच मागे वळुन बघितले. तोंडाला आलेला घाम पिशवीनं पुसला थोडा सुस्कारा टाकत पाउलं अजून झपा झप पडायला लागली. थोडं पुढं गेल्यावर परसात दोघंजन कडब्याची गंज लावताना दिसली आणि जीवात जीव आला.  गावातली भरमू अन्नाची माडी पण दिसत होति. वोलांडली कि आपलच घर.

आजी उंबऱ्यातच शेंगा फोडत बसली होती.  मला बघितलं कि उठुन उभारली, जवळ घेवून मुका घेतला आणि गालावरून हात फिरवून स्वताच्या डोक्यावर कडकडा बोटं मोडली आणि चुलतीला म्हणाली
"आगय बसलीस काय फ़त्काल मांडून उठ कि पाणी आन, दिसत नाही काय का पोरगं एकटाच आलाय फाट्यावरून? "
माझ्या अंगावरून पाणी ववाळुन वट्यावर टाकलं अन हाताला धरून ये बस म्हणणार तेवढ्यात आजीचा मोठा आवाज आला, "पोरगं तापानं फ़न्फन तय गं $$$$ एकटंच आलाय फाट्यावरून, मिरची, किर्सुनी आणि सूप घेवून ये गं, दिस्ट काडू दि गं $$$$ पोराची. " "ई मेलं, ह्याज्या बापाला कळत न्हाय म्हणून आईला कळूनी का, एकटंच पोराला लावलय, पोरगं फाट्यावरून येतं करतं" , "आई लक्ष्मी आई$$ निट करगं पोराला, तुझंच लेकरू हाय! जीवाला मेलं सुखच न्हाय एक सून चांगली भेटली न्हाय, सगळ्या उंडग्या मेल्या! हिला काय काळजी आमच्या वंशाच्या दिव्याची", "वली वली काय न्हाय काय न्हाय आता जातुय बघ ताप पळुन"
तेवढ्यात पण मी आजीला विचारलंच " आये नदीला पाणी हाय का गं पवायला"
आजी, "झोपय मुडद्या काय पण पोरगं बापावरच गेलंय"