Wednesday, March 15, 2017

प्लस व्ह्याली ट्रेक. ताम्हिणी घाट



गावाकड फुफुटा तुडवत रानात जाताना कधी वाटलं नव्हतं कि आपण पण कधी सह्याद्री पालथा घालू, तसे आम्ही सगळे मित्र मिळून स्वप्न खूप बघायचो. एखाद्या शेजारच्या गावाहून क्रिकेटचा सामना खेळून उपाशी पोटी आपल्या गावाकडे डांबरी सडकेहून चालताना तर कधी कधी अंगात आहे नाही तेवढा त्राण आणून ट्रिपल सीट सायकल मारताना आम्ही सह्याद्री मधे ट्रेकिंगला जायच्या योजना आखायचो. त्या अजून तशाच आहेत. क्रिकेट साठी टेनिसचा बॉल घ्यायला तीन चार दिवस वर्गणी करणाऱ्यांच्याच योजना त्या. पण कधी कधी उशिरा का होईना पण स्वप्न पूर्ण होतात, कुणाची लवकर होतात कुणाची होत नाहीत हा भाग वेगळा. आणि स्वप्न पूर्ण झाल्यावर त्या स्वप्नाचे काही कौतुक पण वाटत नाही. पण सह्याद्री मधे भटकंती करत फिरण्याच्या स्वप्नाचे आणि आता महिन्याला कोणतातरी गड किल्ले फिरून ते जगण्याच्या पूर्ण झालेल्या स्वप्नाची नशा वेगळीच आहे. राजगड, तोरणा राच्चइंदारचं फिरलोय, वासोटा जाऊन आलो तेव्हा ते कोयनेचे ब्याक वाटर आणि वासोट्याची उंची वगैरे बघून आमच्या सारख्या तुळजापूरचा घाट एसटीटून वाकून बघून, “आयोव किती मोठा घाटय लका “ म्हणून तोंडात बोट घालणाराच्या भावना शब्दात बांधणे कठीण आहे. 

तीन चार वर्षापूर्वी ताम्हिणी घाटाच्या अलीकडील मोठे धबधबे बघून आजी म्या ब्राम्ह पहिले असे तोंड करून परत आलो होतो. नंतर घाट वोलांडून पुढे गेलो पण काय विशेष वाटले नाही. कारण घाट हा रस्त्यावरून बघायचा नाहीच. तिथून आत उतरून Plus Valley बघितल्या नंतर आणि आत जाऊन फिरल्या नंतर त्या घाटाची भव्यता लक्षात येते. 

बरेच दिवस झाले ट्रेकला गेलेलो नसल्याने अंगातील वाढलेलं टोक्सिक कमी करावं आणि एखादां मोठा डोंगर चढून यावं म्हणून संतोष डूकरेना फोन केला. ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात घास कापत होते आणि म्हनाले, "या इकडे जाऊ हरिश्चंद्रगडाला". पण हरिश्चंद्रगड हा रात्रीसाठी राखून ठेवला आहे. मग ते म्हणाले आपल्या संजय झिंजाडाना फोन करा त्यांना सह्याद्रीतल्या सगळ्या पाणीदार जागा माहित असतात. मार्च मधे डोंगरात पाणी म्हणजे थोर. लगेच संजुदानी Plus Valley मधे जायचे ठरवले आणि आम्ही पाहटे चारला निघालो. 

आम्ही तीन जोड्या आणि त्यातील दोन जोड्यांचे एक एक लेकरू मिळून घाट सोडून दरीत उतारायला चालू केले आणि त्या दरीची भव्यत, दिव्यता भयानकता लक्षात येऊ लागली. आता पुढे काय आहे हे माहित न होता फक्त कड्या कपारिणी चालत राहणे हेच काम होते. हजारो का लाखो वर्षापासून वाहत असलेल्या पाण्याने त्या दरीतील दगडावर असे काही नक्षीकाम केले होते कि त्यादरीतील त्या पायऱ्या कुणी माणसाने हातात छनी आणि हातोडी घेऊन बनवल्यात असे वाटावे. चालण्याच्या नादात आजूबाजूला लक्ष नव्हते.  पण जेव्हा एक मोठा दगड पहिला, थोडेसे थकलो पण होतो आणि पुण्यातून जाऊन तिथली ती शांतात आम्हाला सह्याद्रीच्या  वैशिष्ट्याची जाणीव करून देऊन लागली तेव्हा ती डोळे बंद करून उपभोगावी म्हणून सगळेच शांत बसलो. जरा वेळाने डोळे उघडून आसपास बघितले तर आपण पृथ्वीच्या पोटात गेलो आहोत आणि आतून एका कप्प्यातून आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या परमेश्वरा एवढ्या भिंतीक निसर्गापुढे मानवाच्या शुद्रतेची जाणीव करून देत होत्या.














हळू हळू दरी उतरत गेलो. संजय झिंजाड यांच्या शिवाय कुणालाच माहित नव्हत किती लांब जायचे आहे. पण ते काही सांगायला तयार नव्हते. आम्ही दरीत जेवण बनवून खाण्यासाठी भागूनं , तांदूळ वगैरे आणले होते पण एकूण अवस्था बघता पाणी असेल का नाही याबद्दल आम्ही साशंक होतो. मग संजुदा म्हणाले, आता माहित नाही पण गेल्या वर्षी फेब्रुवारीत आलो होतो तेव्हा होते पाणी. माग मिआतून किती घाबरलो हे वरतून दाखवले नाही. म्हणजे बाटल्या पूरवायच्या आणि उपाशी दर्या खोर्यातून चालत राहायचे हा विचार काय लय थोर नव्हता. भीतीयुक्त आश्चर्य चकती होऊन चालत राहिलो. तर डाव्या कड्यातून माकडाचे आवाज येऊ लागले. तीर्थास्थाळाच्या ठिकाणी पाहतो त्यापेक्षा लहान माकडे होती. ती पिल्ले नव्हती. तीपिल्ले नव्हती पण नैसर्गिक वातावरणात आणि मनवी वस्तीपासून दूर राहिल्याने त्यांचा आकार नको तेवढा वाढला नसावा. तिथे पण तेच चालू होते. एका माकडाला सगळी माकडे मिळून त्या कड्यावरून ढकलून देत होती आणि ते माकडा स्वताला सावरायचा प्रयत्न करत होते. अगदी फेसबुकवर आणि माणसाच्या खर्या आयुष्यात होते तसेच. शेवटी आपण त्यांचेच वंशज  पडलो.



या वरील कड्यातील भोकं हि माकडाची घरे आहेत. फोटो मोबाईल मधून काढल्याने माकडे आलेली नाहीत.


शेवटी दरी उतरलो आणि माझी नजर पाणी शोधू लागली. एके ठिकाणी पाणी सापडले, साठलेले होते तेच घ्यावे कि असा विचार आला आणि थोडेसे पुढे गेलो तर एका सुंदर झऱ्याने स्वागत केले. म्हणजे कशाचीच कमी नसावी आणि अपेक्षित सगळे पदरात पडावं असंच झालं.













आता येवढं सगळं आहे असे झाल्यावर वेळ होती स्वयंपाकाची. तिथेच तीन दगडे मांडून चूल केली आणि गाडी माणसं पोहोत होती तोपर्यंत बाया माणसांनी स्वयपाक केला.






आणि मग खा खा खाऊन दुपारची डुलकी जंगलात.






आता या नंतर मला वाटले झाले असेल आता घरी निघायचं तर संजय झिंजाड म्हणाले आता तर ट्रेक चालू झालाय. आता ह्या बाजूने आलो, आता अधिक चिन्ह पूर्ण करण्यासाठी वरच्या बाजूला बाहुबली धबधबा बघण्यासाठी जायचे आणि मग पुन्हा त्याच्या उलट दिशेने डोंगर चढून वरती हायवेला लागायचे. हेअजीबात थोर नव्हते पण चालायला चालू केल्यावर जेवढे कष्ट पडत होते ते योग्यच होते अशी ती दरी आहे आणि तिथलीई दगड पाण्याने तयार केल्या घळी वगैरे सगळे थोर आहे.









कोरडा पडलेला छोटा बाहुबली धबधबा, अएतर म्हणत नसेल ना, आरे माझे पण दिवस असतात , आणि कोरडा असलो तरीमाझ्या वैभवाच्या खुणा तुम्हा ह्या दगडावर दिसतील, ज्या कड्यावरून मी कोसळतो त्या कड्यावर दिसतील.









आणि याचं साठी केला होता हा अट्टाहास. 








बरे हा प्रवास इथे संपत असेल तर ठीक होते पण इथून पुढे खरे आव्हान होते. म्हणजे पूर्ण परत येऊन विरोधी दिशेने डोंगर कदा चढून वरती जाणे. इथे रस्ता चुकणे, आज रात्र इथेच काढावी लागते कि अशी भावना मनात येणे, पोराचे पाय अचानक दुखायला लागणे तरी पण त्याला शाब्बास शाब्बास म्हणून चालत राहायला प्रोस्ताहित करणे. एकदा तर असे वाटले होते कि महाभारतातील  युद्ध संपल्या नंतर पांडव, कुन्ती  गांधारी वगैरे मंडळी स्वर्गाची वाट चालू लागतात आणि ती वाट संपता संपत नसते तशी हि पण वाट संपते कि नाही असे आमच्या पण मनात येऊ लागले होते. ती स्वर्गाची वाट हिमालयातून जाते हि सह्याद्रीतून. 












दरी चढून वरती आल्या नंतर कोकणा कढील बाजू.