Wednesday, May 14, 2014

बुद्धा


संवेदनशील तर सगळेच असतात. कुणी कमी कुणी जास्त. भोवताली घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुद्धा स्थळ, काळ, आणि मनुष्याच्या स्वभावानुसार बदलतो. भोवतालच्या नैसर्गिक किंवा मानव निर्मित घटनांचा प्रभाव सर्व लोकावर सारखाच पडतो असे नाही. काही लोकांना अतिशय शुल्लक वाटणारी घटना काही लोकांचे आयुष्यच बदलू शकते. अश्या अनेक घटणांचे संवेदनशिलतेने निरीक्षण करून मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी किती लोक प्रयत्न करतात?  ज्याच्याकडे काहीच नाही किंवा जो पराभूत आहे त्याने केलेल्या त्यागाला तेवढी उंची प्राप्त होवू शकत नाही. पण ज्याच्याकडे सर्व काही आहे किंवा ज्याला अजून पराभवच माहित नाही अश्या माणसाने केलेल्या त्यागाला एक वलय, उंची प्राप्त होते. जग त्या त्यागाकडे एक आदर्श त्याग म्हणून पाहते.

साधारण दोन हजार सहाशे वर्षापूर्वी असाच लहाणपणापासून संवेदनशील असलेला एकोणतीस वर्षाचा राजपुत्र आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांमुळे विचलीत होतो. आणि मनात उठलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी घर, बायको, मुलगा, राज्य, अधिकार सगळे सोडून सत्याच्या शोधात जातो.  त्याचा हा त्याग अखिल मानव जातीच्या कल्याणसाठी होता. स्वताच्या कल्याणासाठी किंवा स्वताला जीवन मुक्तीच्या फेर्यातून मुक्त करून घेण्यासाठी नव्हता. त्यामुळे त्याचा घराचा त्याग हा आदर्शाच ठरतो. त्याकाळी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक मार्गावर चालून ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न तो करतो.प्रत्येक मार्गातून त्याला काहीतरी मिळतेच पण ज्या गोष्टीच्या शोधात तो वणवण फिरतोय तीच गोष्ट अजून मिळालेली नाही याची जाणीव पदोपदी होतेय. त्याने  केलेल्या गुरूच्या माध्यमातून आत्मसात केलेल्या ज्ञानातून काही उत्तरे तर मिळतात पण अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात किंवा राजकुमाराचे समाधान होत नाही. आपण ज्या गुरूच्या माध्यमातून अपेक्षित उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत तिथे अपले समाधान होन्याचि शक्यता नाहि हे दिसताच तिथुन तो नविन मार्गाच्या शोधात निघतो. तात्कालीन सत्य शोधन्याच्या मार्गात स्वताच्या शरिराल त्रास करुन घेने, उपाशि राहने अश्या अनेक गोष्टींचा समावेश होता. एक वेळ तर आशी येते कि जो पर्यन्त ज्ञान प्राप्त होत नाहि तोपर्यन्त अन्न ग्रहन करणार नाहि असे ठरवुन हा राजकुमार ध्यान लावुन बसतो. मरणासन्न अवस्थेत असलेल्य ह्या साधुला एक मुलगि पहाते आणि दुध आणि गव्हाचि खिर देते. तो राजाकुमार खिर खातो अणि आपला खुप दिवसाचा उपवास सोड्तो. ती सुजाता. ती नसती तर हे जग तथागथाला मुकले असते का हा प्रश्न मला नेहमी पडतो. आश्या अणेक खड्तर प्रवासातुन मार्गक्रमन केल्यानंतर  ह्या राजकुमाराला ज्ञान प्राप्त होते व ते ज्ञान तो जगाच्या कल्यासाठी  लोकाना देत आयुष्य कामी लावतो.

संत तर खूप असतात पण गौतम बुद्ध हे मानवि इतिहासातिल एक मैलाचा दगड आहेत. ते स्वयन्भु आहेत त्यांचा कुणीही गुरु नाहि. त्यांनी मिळवलेले ज्ञान हे सरस्वी त्यांचेच आहे आणि ते लोकाना देवुन लोकांचे  जगने सुसह्य करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे जग त्यांचे कायम ऋणी राहील.  आस्तिक माणसाला देवळात घेवून जाण्याचे काम तर कुणीही करीन पण नास्तिक माणसाला सुद्धा देवळाकडे घेवून जाण्याचे काम त्यांनी केले. प्रस्थापीथ ज्ञानाला नाकारून सर्व समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर काढण्याचे काम बुद्धाने केले. ज्या काळी यज्ञ हि संकल्पना समाजातत अश्या तर्हेने रुजली होती कि त्याच्या खर्चामुळे तत्कालीन सामान्य जनताच नाही तर राजे राजवाडे यांचे सुद्धा दिवाळे निघत होते. त्याकाळी सामान्य जनताच फक्त आपला प्रसाद देवांपर्यंत पोहचवण्यासाठी  ब्राह्मणावर अवलंबून नव्हती तर देवांना सुद्धा भक्ताकडून प्रसाद घेण्यासाठी ब्राह्मणावर अवलंबून राहावे लागते असा समज समाजात रूढ झाला होता. त्यामुळे देव आणि समाज दोघे पण ब्राह्मणावर अवलंबून असल्यामुळे ब्राह्मणांचे महत्व समाजात देवा पेक्षा जास्त वाढले होते. ह्या यज्ञांच्या मुळावर घाव घालून समाजाला एकप्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम गौतम बुद्धाने केले.

सिद्धार्थ गौतमला ज्ञानाच्या शोधातील प्रवासामध्ये ज्या अडचणी आल्या जी संकटे आली किंवा आणली गेली ती मारा नावाच्या एका काल्पनिक व्यक्तिमत्वाने. हे मारा नावाचे काल्पनिक घटक सर्व लोकांच्या मध्ये किंवा आसपास असततात आणि माणसाला त्याचे इप्सित सध्या करण्यापासून रोखत असतात. अश्या मारांच्या तावडीतून सुटण्यासाठी गौतम बुद्धाची शिकवण मानवी समाजाला कायम साथ देईल. सिद्धार्थ  गौतमला मार्गदर्शन करण्यासाठी कुणीच नव्हते, त्याला त्याचा मार्ग स्वताच शोधावा लागला आणि स्वताच स्वताच्या मनातील नकारार्थी भावनावर विजय मिळवावा लागला. त्याला ते शक्य होवू शकले. सर्व मानवजातीला ते शक्य होणे नाही. पण आज माणसापुढे तथागातना सापडेलला आणि त्यांनी अखिल मानव जातीला शिकवलेला मार्ग आहे. तो जरी मानव जातीने पत्करून त्यावरून मार्गक्रमण केले तरी जगातील दुःख आणि भीती संपून जायला किंवा कमीत कमी कमी व्हायला मदत होईल.

बुद्धं शरणं गाछ्यामि !



3 comments:

  1. मानवाच्या उत्कार्ष्यासाठी बुद्धाने मांडलेले विचार काळाच्या कसोटीवर पण खरे उतरले आहेत , गरज आहे त्याला कृतीशीलतेची जोड देण्याची !! आजच्या बदलेल्या भौतिक परिस्थितीत त्यांच्या विचाराचा उपयोग कसा करावा यावर प्रबोधन होणे गरजेचे आहे नव्हे ती काळाची गरज आहे , छान लिहिले विकासराव , जर अजून खोलात शिरून विस्तृत लिहिले तर बरे होईल .

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर योगेश, अजून लिहिता आले असते

      Delete
  2. https://www.maximizemarketresearch.com/reporttype/material-chemical/

    ReplyDelete