Thursday, May 8, 2014

कैलाश पर्वत आणि पर्वतारोहण



एका शतकापुर्वी कैलाश पर्वता विषयी अनेक रहस्य उलगडलेली नव्हती. पवित्र समजला जाणारा पर्वत बाहेरील जगासाठी एक अख्याइकाच होता. चीनच्या विस्तीर्ण पसरलेल्या प्रदेश्याच्या आणि भारतीय उपखंडाच्या मध्ये प्रतिबंधित साम्राज्य तिबेटच्या पठारावर हा पर्वत लपलेला आहे असा फक्त समज होता. या पर्वताची उंची ६६५८ मीटर आहे. ब्रह्मपुत्रा, सतलज आणि सिंधू या तीन दक्षिण आशिया मधील महत्वाच्या नद्यांचा उगम कैलाश पर्वत रंगामध्ये आहे.  तिबेट मध्ये या पर्वताला "गंग्कर ती से" म्हणजेच "बर्फाचा पवित्र पर्वत" या नावाने ओळखले जातो. हा पर्वत फक्त बुद्ध धर्मासाठीच नाही तर हिंदू, जैन धर्मासाठी आणि इतर अनेक पंथासाठी सुद्धा पवित्र समाजला जातो. १९३० साली इटलीच्या टुसि या तिबेटोलोजिस्टने या पर्वताला जगाची "नाभी" अशी उपमा दिली होती, तो असे पण म्हणाला होता कि हा पर्वत म्हणजे पृथ्वीवासियांना देव लोकांपर्यंत पोहचवणारी शिडी आहे आणि यावरील चमकणाऱ्या राजवाड्यात ३६० देव वास करतात. ह्या पर्वताच्या धार्मिक अधिष्ठाना मुळे याच्यावर अजून कुणीही पर्वतारोहण केलेले नाही किंवा यावर  कुणीही चढलेले नाही. रेन्होल्ड मेस्नेर या इटालियन पर्वतारोहीला १९८४ मध्ये पर्वताच्या कडेकडेने फिरायची परवानगी मिळाली होती पण त्याने पर्वतावर चढाई केली नाही किवा वरती चढून प्रदक्षिणा पण घातली नाही. कारण पर्वतारोहिनीच ह्या पर्वतावर न चढण्याची परंपरा पाळली होती आणि ती रेन्होल्डणे मोडावी असे इतर पर्वतारोहीना वाटत नव्हते. या पर्वतावर चढणे म्हणजे पर्वतात रुपांतरीत झालेल्या देवावर पायात बुट घालू चढल्या सारखे होईल यावर पश्यात्य पर्वतारोहीमध्ये एकमत झाले होते. त्यानंतर अजून कुणालाही परवानगी मिळालेली नाही. २००१ मध्ये जीझस मर्टिनेस नोवास ह्या पर्वतारोहीने चीन सरकारकडे कैलाश वर पर्वतारोहण करण्याची परवानगी मागितली होती, त्याला जगाला तिथून शांततेचा आणि पर्यावरण विषयक संदेश जगाला द्यायचा होता. परंतु त्याच्या ह्या मोहिमेला धार्मिक कारणासाठी चीन, तिबेट आणि भारता  मधून विरोध झालाच पण बाकी गिर्यारोहकांनी पण विरोध केला कारण स्थानिक भावना दुखावून कोणतीही मोहीम करू नये अशी भावना जगातील गिर्यारोहाकामध्ये होती.


2 comments:

  1. असं अर्धवट लिहायचं नसतं राव, :-:-( चांगला इतिहास कळत होता , अर्धाच लिहिलात!

    ReplyDelete