Thursday, July 25, 2013

कारखान्याच्या चाळीवर कामगारांच्या पोटाची भूक तर भागत नव्हती, पण त्यांच्या पारमार्थिक भुकेची गरज लक्ष्यात घेवून कारभार्यांनी सिमेंटच्या पत्र्याचे  देवूळ बांधून दिले होते. कामगारांच्या करमणुकीच्या साधनांची चिंता कारभाऱ्याना नव्हती, कारण त्यांच्याच  कार्यकर्त्यांनी न सांगता तिथे गावठी कसिनो (मटका केंद्रं आणि जुगार अड्डे ) उभारल्यामुळे कामगारांना  करमणुकीचे आणि पैसे कमावण्याचे साधन आपोआपच उपलब्ध झाले होते. देशी मदिरा म्हणजे हातभट्टीच्या दारूची मुलभूत गरज भागावी म्हणून सगळ्या कामगारांना उधार दारू मिळेल याची पण सोय करण्यात आली होति. अश्या तऱ्हेन सहकार चळवळीचा पाया म्हणजे कामगार आणि त्यांची कुटुंबे याची जीवापाड काळजी घेण्यासाठी कारभारी हमेशा जागरूक असत. फक्त पगार मागायचा नाही हि एकच अट होति. आणि ते कामगार जीवाला जीव देवून पाळत होते. हे लोक मोठ्या  साहेबाकडं म्हणजे दिल्लीच्या वाटेकडं रात्रंदिनी नजर दिवून असत. कारण हा मोठ्ठा साहेबच फक्त आपल्यासाठी कायतरी करणार अशी जबराट आश्या कामगार आणि कामगारांच्या लेकरा बाळांना असायचि.

आता येवढं  कामगारासाठी करुन् धरून अजून कामगारांच्या नुकत्याच मिसरुट फुटलेल्या , जवान झालेल्या आणि जवानी येवून गेलेल्या पोरासाठी पण कारभार्यांनी काय तरी करावे हि म्हणजे अति अपेक्श्या ठेवल्यासारखे होते. त्यामुळे ह्या पोरांनी स्वतःच एक तरुण मंडळ स्थापन केले होते. आणि ह्या तरुण मंडळाचे काम हे पत्र्याच्या बनवलेल्या इठ्ठल रुक्मिणी मंदिरातून चाले. काही पारमार्थिक लोकांचा संध्याकाळचा तीन तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम सोडला तर बाकीचे एकवीस तास हे देवूळ तरुण मंडळाच्या कब्ज्यात असे.

सकाळी ७ वाजता झोपेतून उठुन घरी गेले आणि अंघोळ चापानी करून आठ वाजता परत तरुण मंडळाचा कार्यक्रम चालू होत असे. दोन पत्त्याचे डाव, एक बुद्धिबळ आणि एक क्यारम. अश्या तऱ्हेन कधी पैश्यावर, कधी शेव चिवड्यावर, तर कधी चहा सिगरेटिवर व गाय छ्यापवर  डाव चालत. ह्या मंडळीमध्ये चावट, पाववाला, क्याप्टन, क्रोन्जे, टणक, गुडगा, इंजनेर, मास्तर  अशी आन्डील मंडळी होती आणि बाकी लिम्बुटिम्बु खुर्दा पण भरपूर होता.

दहा ते अकरा वाजता सकाळी यातील  एका दोघाची तरी आई देवळात यायचीच  अन आपल्या पोराला म्हणायची, " तुझा बाप कालपासून घरी आला नाही बघ तरी पोरा कुठं हाय ?

पोरगा, " घालू  दि आय मरू दि , तू जा घरी देवळात येत जावू नकु!
आई तिथल्या दुसर्या पोराला , "होय इंजनेर साहेब , मास्तर जरा  येतो का रं बघून त्यांना कालपासून आलं  न्हायतं ?
मास्तर, " मला माहिताय मामी, काल मामा टिग्याच्या दारूच्या दुकानात पडलं व्हतं उतरली कि येत्याल"

पण मित्राच्या आयचं  मन मोडायचा न्हाय म्हणून मास्तर डाव कुणाच्या तरी हातात देवून जायचा आणि त्याच्या मानलेल्या मामाला ढकलीत घरी घेवून यायचा. आसंच ठरलेलं होतं आपल्या बापाला आपण न्हाय आणायचं तर आपल्या मित्रानं आणायचा कारण त्यामुळे आपली इज्जत कमी जाते. तसा इज्जत जायचा सवाल लय कमी वेळा यायचा कारण पेत  कोण न्हाय हेच हुडकावं लागायचं.

पण चावट ह्याला लयच कंटाळला व्हता, त्याचा बाप जरा  जास्तच करायचा म्हणजे घरी कमी आणि दारूच्या अड्ड्यावर जास्त. तो एक दिवशी पोरांना म्हणाला टिग्याचा दारूचा कोटाच जाळू, सगळं दुकान जाळून टाकू बघू कोण काय उपटतय आपली, पोरांनी माना हलवल्या झोपी गेलि.  पंधरा दिवसांनी रात्री दोन वाजता पोरांनी एकमेकाला उठविले आणि लांबूनच मोठी आग दाखविली टीग्याचं दारूचं दुकान जळत व्हतं आणि चावट शेजारीच तोंडावर पांघरून घेवून झोपला व्हता. त्याची छ्याती मोठा मोठ्या श्वासो छ्वासाने हलत होती हे सगळ्यांनी बघितले आणि त्याला नाही उठविले.

आज पंधरा ते अठरा वर्ष नंतर चावटचि दोन पोरे त्याला तसाच दारूच्या दुकानावून घेवून येतात आता मालक बदललाय टिग्याच पोरगा हाय. परवा कळलं कि टिग्याच्या पोराचं दारूचं दुकान पण कुणीतरी जाळलं.
पण टिग्याचं पोरगं आता तिथं नवीन चिरेबंदी दुकान बांधणार हाय. बगू कोणता आयघाला आग लावतुय आता असं म्हन्तोय.
कारखाना तसाचय पडिक अवस्थेत, चाळी पण तस्याच आहेत,  भोसडा उदास झालाय फक्त कामगारांचा. कारखान्याच्या कारभार्यांनी आता सहकार सोडुन दुसरा खाजगी कारखाना काढलाय, कारभाऱ्याचं  लयच जोरात चालू हाय म्हणं आता त्याला मोठ्या साहेबाचा डायरेक्ट आशीर्वाद मिळालाय.
विना सहकार नाही उद्धार !



Wednesday, July 17, 2013

आठवण !

ऑफिसमधल्या वातानुकुलीत केबिन मध्ये बसून रानातल्या उनाच्या झळयाचि का आठवण येत असेल? दुपारचं लिंबाच्या झाडाखाली पडलोय लांबून कुठून तरी कुणाची तरी ज्वारी करायची राहिली होती त्या मशीनचा आवाज, अंगाखाली युरियाच्या पोत्यापासून केलेलं चवाळं , उशाला चप्पल, कंटाळा आला म्हणून अभ्यासाचं पुस्तक बाजूला ठेवून खालून दिसणाऱ्या लिंबाच्या शेवटच्या फांदीकडे बघून काय विचारत करत होतो मी , आता नाही आठवत. उगीचच आता लांब असल्यामुळे मिसिंग वैगरे वाटतंय, नाहीतर त्या मातीपासून दूर जाण्यासाठीच तर होता तो सगळा अट्टाहास .

माझे गाव आणि गावचा विकास

गावच्या विकासाच्या बातम्या कानावर पडत होत्या, पण आज गावचा विकास याची देही याची डोळा पाहिला. म्हणजे ह्या वर्षी लक्ष्मी आयच्या देवळाला दहा लाख रुपये खर्च केला, गेल्या वर्षी वीस लाख केला होता, आता सगळीकडे स्ल्यापच आहे त्यामुळे एकाच वेळी चार चार लग्नाचे वऱ्हाड बसू शकते. उन्हाळ्यात गार गार हवा असते त्यामुळे डाव खेळणाऱ्या लोकांना पण त्रास होत नाही. पिचकाऱ्या मारायला उठायला लागून नये म्हणून एका कोपऱ्याल...ा लालच रंग दिलाय. तसेच मरिआयचे, खंडूबाचे , जोतिबाचे देवळाचे पण बांधकाम जोरात चालू आहे. आजी आमदाराने दोन लाख, खासदाराने ४ लाख, भावी आणि महात्वाकांशी आमदार खासदारांनी पाच पाच लाख देवून गावाच्या विकासात भरीव योगदान दिल्याचे पण कळले. ज्या भावी उमेदवाराने देवळाला पैसे दिले नाहीत त्या उमेदवाराला गावात प्रवेश करू द्यायचा नाही असा पुरोगामी ठराव ग्रामसभेने पास केला. गावची एकी जबराट. गावचे कारभारी गावच्या विकासाची वित्ताम्बात देत होते. गावच्या प्रत्येक नौकरदार माणसाने दोन दोन हजार द्यायचे ठरले आहे, मला पण म्हणाले, तुला पण आज जे काय मिळाले आहे ते लक्ष्मि आयच्या आशीर्वादानेच मिळाले आहे, "म्हणजे नौकरी ". मी पण तिच्या उपकाराची परत फेड करावी अशी त्यांची रास्त अपेक्श्या होति. नाहीतर लक्ष्मिआय लईच कडक हाय, आमची म्हातारी एकदा म्हणालेली आठवलं. गावात चकचकनारी देवळे बघितले कि गावातल्या प्रत्येक माणसाला गावाचा आभिमान वाटल्या शिवाय राहत नाहि. प्रवेश द्वाराशीच मादिरालये शोभेत आणखीच भर घालतात, जिथे फुग्यापासून, देशी पर्यंत आणि रमा पासून टीचर्स पर्यंत सगळेच उपलब्ध करून दिले जाते. अश्या दुष्काळी भागात चील्ल्ड पाण्य्याच्या बाटलीपासून बड्वयसर पर्यंत सगळे मिळते. रात्री अपरात्री बायकांना संडास, लघवी सारख्या तुच्च्या गोष्टीसाठी नदीला जायचे म्हटले तरी ह्या तळिरामनच्या सोबतीमुळे भीती वाटत नाहि. तो एक खूपच मोठा फायदा आहे ह्या मादिरालायांचा . घरात संडास हे आमच्या शानच्या खिलाप असल्यामुळे गावात शिरताच आपल्याला सुगंधाशी वोळख करून घ्यावी लागते त्याच्या विषयी चार गोष्टी सांगाल तर चार बुकं शिकून आम्हाला न्यान हेप्लु नकु अशी ताकीद मिळते. त्यामुळे आपल्याला पण गावाच्या विकासात सहभागी होण्यावाचून पर्याय रहात नाहि. आता विकासच होत असल्यामुळे तरुणांना गावात मदिरापान करणे अपमानास्पद वाटते त्यामुळे अश्या आसपासच्या गावातील तरुणांची व्यवस्था गावच्या आसपास तीन चार धाबे टाकून केली आहे. तिथे बसून कारभारी आपल्या आपल्या गावाची दिश्या ठरवतात. तिथे बसूनच दोन बाटल्या पोटात गेल्यावर एका अतिशय जबाबदार कार्यकर्त्याने एक महत्वाची सुचना मांडली - नवीन बांधलेल्या देवळात लग्नाच्या येळाला इटाळाच्या बाया येत असल्यामुळे देवीला इटाळ चांडाळ होत आहे त्यामुळे आता गावात नवीन मंगल कार्यालय होयालाच फायचेल. एक सेकंदात ह्या ह्या पाठ्य्याने ठरावाला अनुमोदन दिले आणि नवीन मंगल कार्यालयाचा ठराव मंजूर झाला, लगेच फोनवर वर्गणी बुकाची ओर्डर दिली, !!लक्ष्मिआय प्रसन्न!!

बाबू and ड्यापोडील्स

चार वर्ष्याचा जुनियर केजीला तालुक्याच्या "ड्यापोडील्स" मध्ये शिकणारा बाबू दुपारी बारा वाजता स्कूल बसने गावात येतो. रानात जायला नातवाची वाट बघत बसलेला आजा आलेल्या बाबुला विचारतो "बाबू$$$ काय शिकविलं आज बाईनी ?" बाबू " लेन लेन गो अवे , कम अगेन अनादर डे" आजा " आरे वा !! मजी काय रं बाबू? " बाबू, "आलं आज्या मजी , पावसा पावसा दूर जा, पुन्हा कदि तली ये" आजा , आर तुझ्या बी अन तुझ्या टीचरच्या बी आयला, उद्या येतोच तुझ्या शाळत, बघतो कोण आवदसा हाय पावसाला येवू नकु म्हणतीय!" आयला असल्या दालीन्द्री शाळा आल्यात मनून तर पावूस इनाय, नाहीतर उद्यापासून जायचं " संत तुकाराम " शाळत अमी न्हाय का शिकलो तितं !

उन्हाळ्याच्या दिवसात रानात झोप

उन्हाळ्याच्या दिवसात लयच उकडतय आन सगळिच जात आहेत म्हनुन आपण पन रानात झोपायला जातो, नजर जाइल पर्यंत फ़क्त काळे रान आहे, कुठेतरि मधेच एखदा लिम्ब एखादी रामकट उन्च आकाश्यात गेलेलि अनि चन्द्रप्रकाशा मुळे एखाद्या फ़रशि कुऱ्हाड उगारणाऱ्या गारद्या सारखी दिसणारी. हे बघत बघत आपण बाकीच्या पोरांच्या मध्ये अंथरून टाकतो झोपतो आणि नेमकी पहाटे चारला एकट्यालाच जाग येते. तोंडावर लेपाटं वोढून घेतो, शेजारील पिं...पळाच्या पानाचा आवाज आपल्याला घाबरवत असतो पण जर वेळाने धाडस करून तोंडावरचे पांघरून काढतो आणि पिम्पळाकडे बघतो… मस्त पिम्पळाअडुन चंद्र दिसत अस्तो… शिळुप्याचं दुरून गावातल्या रामाच्या देवळातला काकड भजनाचा आवाज येत अस्तो, अंगावर सुखद वार्याची झुळूक जाते आणि आपले धाडस अजून वाढते, उठुन बस्तो…. इकडे तिकडे बघतो, शेजारच्या पोराच्या उश्याला तंबाखूची पुडी दिसते, चट्कन उचलतो पण चुना सापडत नाहि… सगळ्यांच्या उश्याला बघतो, शेवटी एक्जनाच्या उश्याला वाळलेल्या चुन्याची पुडी पडलेली असते किती आनंद होतो. पट्कन विडा मळतो आणि तोंडात टाकून ह्या विस्तीर्ण शांततेचा आनंद घ्यावा म्हणलं तर शेजारच्या पोराचा आवाज येतो, "घाल आय झोप आता अजून लई उशीर हाय दिवस उगवायला

उस पिक, तथाकथिक तत्वज्ञ आणि विचारवंत

हुटावरून शेळ्या राखणारे तथाकथिक तत्वज्ञ आणि विचारवंत म्हणत आहेत कि उस पिक बंद करा . लयच भरि. राव दुष्काळ हटेल . त्यांना विचारतो आरे भावानो तुम्हाला तूर डाळ आणि जवारी खावू घालून आमचे पोट नाही भरत राव, आणि तुम्ही आम्हाला कश्याला गिन्यान शिकवता, कि उस वाइट , साखर कारखाने वाईट , जे असे म्हणत आहेत त्यांच्या बापजाद्यांनी कधी गावात एखादी संस्था काढली आहे का त्यात गावातल्या पोराला नौकरी लागावी? शेतकऱ्यांच...्या कैवार्यांनी सांगावे कि बाबा तू उस करू नको आणि हे पिक लाव म्हणजे श्रीमंत होशिल. आरे भावा तूर, कापूस, जवारी लावून वघितले शेतकरी भिकारीच! डाळीचा भाव तुम्हाल साठ रुप्पये चालत नाही? जवारी तीस रुपये म्हणजे महाग, गहू तर वीस च्या आताच मिळायला पाहिजे, बाबो साखर तीस रुपये लय महाग, (आणि उस दारासाठी आंदोलन करणारे हेच लोक) हे काय शेतकऱ्याला समजत नाही का? एक वर्ष दुष्काळ पडल्यावर ज्यांना साखर आणि उस ह्या निमित्ताने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर बाण मारायची संधी मिळाली आहे त्यांना मी एकाच प्रश्न विचारतो बाबानो आम्हाला पर्यायी पिक द्या , भाव द्या आम्ही तुमच्या मागे येतो. आहो दोन तोण्डि महनडुळ म्हणजे, कांद्याचा भाव वाढला म्हणून पुण्यात आंदोलन करणे आणि कांद्याचा भाव कमी झाला म्हणून गावाकडे जावून शिव्या देने. शेतकऱ्यांची पोरे शिकली आता कळते त्यांना पण सारे. दोन एकर तीन एकर वर भागणार नाही म्हणून शिक्ष्यान घ्या आणि नौकरी करा हा संदेश काय वाईट होता का शरद पवारचा ? पण त्याचा अर्थ प्रसार माध्यमांनी किती वाइट काढला हे पण शेतकऱ्यांची पोरे बघत आहेत! अगदी डोळसपणे! काही लोकांच्या घुंगराच्या अवाजापाय शेतकर्याचा का मनून बळी देताय, घुंगरे वाले लय दिस राहणार नाहीत हे आपल्याला माहित आहे .

गांधारी मावशी

घरी पोचून अर्धा एक घंटा झाला आसल , कि बाहेरून आवाज, कोण पकू (प्रकाश ) आलाय व्हय? गांधारी मावशीचा आवाज मी लांबूनच ओळखला .

आई, "व्हय आताच आलाय "

गांधारी मावशी , "येरय पोरा च्या प्यायला, लय दिसांनी आलाय ग माय, एकटाच आलाय जणू?

आई गपच! मी, "येतो येतो मावशे आलोच हात पाय धुवून!

आमच्याच घराच्या मागच्या परसात परटाच्या वाड्यामागून गेलं कि तिचं घर. घर मजी जुन्या वाटणीत आलेला वाडा म्हणायचा म्हणून एक दग...ड मातीचं वरती माळवद असलेलि जुनी खोली आणि समोर तुराट्याचा कुड बांधून केलेलि अजून एक खोली, बाहेर शेळ्या बांधलेल्या, त्यांच्या लेंड्या, मूत आणि शेजारीच चुलीवर ठेवलेला गाडगं. गाडग्यात आम्बड्याचि भाजी शिजत असलेल्या जुन्या ओळखीच्या वासानं मला बरंच वाटलं.

गांधारीनं आला व्हयरं, म्हणुन दोन्ही गालावर हात फिरवून बोटं कडा कडा मोडली, थाम थाम, सतरंजी हातरते असं म्हणून कधीकाळी सतरंजी असलेलं एक मोठं फडकं हातरलं .

बस! एकटाच आलाय व्हयरं? असू बापडिचं, लय ताप पडत आसल पोराला अन बायकुला घिवून यायला, खुशाल हायती नव्हं? लय शिकल्याली हाय म्हनं तुझी बायकू? पोरगं मोठ झालं आसल आता, जातं का शाळत?, चांगला सायाबासारखा दिसतुयास बग आता, किती हड्कुळा व्हता, निका गावात कुत्री मारीत फिरायचा, लय खस्ता खाल्या बग तुझ्या आयनं, नवर्याचा ताप, तू तर काय सळायाचास बाबा, तीन पोरीवर तू लाड्काच, पण मावलीनं सगळं केलं बग, कदि म्हणून वैताग केला न्हाय, थाम पवं करते… नकु नकु , आगं लय पोट भरलय माझं, घरी आल्या आल्या वांग्याची आमटी आणि भाकर हानलीय कुस्कुरून, थाम मग च्या करते, कोराच कर, आरं कारं ? घरचं दूद हायकी, लगीच काडते शेर्डीचं ताजं दूद,

आग न्हाय मावशे मी कोराच च्या पेतो आग वजन कमी व्हावं म्हणून,

आरं वजन कमी हुइल तुझ्या वैऱ्याचं ! आसं रं का म्हन्तुस?

एक घोट घेतला, शेळीच्या दुधाचा चहा जात नव्हता!

कसाबी आसुदि तुजा बाप, पण तीन पोरीची लग्न केली , तुला शिकवलं, काय कमी केलं रं ? त्याला काय म्हणत जावू नकुरं, आता आसतो एकाद्याला नाद ती काय लोकाच्या माणसावणी घरदार सुडुन निस्तं पेतच न्हाय बसत , श्यात तर इकलं न्हाय न्हवं ? तूबी पेतो का काय? न्हाय कानावार येतं मनून इचारलं , जावू दि काय बी ऊटवित्याति गावात, कुणाचं काय चांगलं झाल्यालं बगवतं काय, लयच बारा बोड्याचं हाय आपलं गाव ! आन चौवीस घंटं जरी पेला तुझा बाप, तरी तुला काय लय हाय व्हय, लय पगार हाय मनं कि तुला? किती हाय ? उगं मानसं मंत्याती मनून इचारलं ! चांगलाय पगार मावशे! नकु सांगू आमाला न्हायतर आमि कवा तरी मागायचो तुला!

एक काम करकी आमच्या संतुला काम बग कि, घीवून जा कि पुण्यात, बग कि रं कसली लक्ष्मी वाणी बायकू हाय दोन पोरं हायती अन हि पोरगं उटलं कि पिपळाकडंच पळतंय, डावच खेळतय दिस कळत न्हाय रात कळत न्हाय , काम न्हाय काय न्हाय! ती दोन चार गाबडी हायती वरच्या गलीची, गार भरली त्यांची, त्यांनीच नाद लावलाय, निहरी करून गेला कि रातच्याला कवा येतो त्याच्या बायकुलाच माहित,

आता तर दोन एकर इकून ट्याक्टरच घ्याचा मनतय, मी तर हातच टेकलं बग ! काय न्हाय बग त्याच्या पोराकड बागू जीव तुटतो, माझं काय राहिलं आता लाकडं नदीला गिली, ह्या मावलीची काळजी वाटती. व्हय मावशे घेतो गाठ संतुची, येवू का आता?

आरं आणि एक गोष्ट, त्या कोंडीराम बामनाची दोन एकर इकायला निघाली म्हनं घिवून टाक तेवढी, तुझ्या दाजीच्या आईक्न्यात हाय ती, तुझ्याशिवाय कुणाला न्हाय देणार, त्याची पोरं मनं कुटं पर मुलकात अस्त्याती त्याला कायला पाहिजे आता शेति. तू घिवून ठिव आरं माघं पुढं कामाला येती, किती जरी लांब गेला तरी मरायला गावातच यायचाय कि, हाय का न्हाय, आर आपलं जनगोत हितं! गाव सुडून जमतंय का आपल्याला?

व्हय व्हय मावशे बघतो कायतरी, येवू का?

व्हय येत जा गावाकडं , तेवढं जीमिणीचं बघ!

हाल्या भुसा खातो

जुन्या माणसांकडून ऐकलेली गोष्ट.
आमच्या गावाजवळ येरमाळा म्हणून येडाई या देवीचे तीर्थक्षेत्र म्हणावे असे ठिकाण आहे. दर वर्षी उन्हाळ्यात ह्या देवीच्या टेकडिवजा डोंगरावर मोठी जत्रा भरते. तमासे, चित्रपट ग्रहात न चालणारे मराठी चित्रपट, पाळणे, फुगे खेळणी , डोंबार्याचे पुळ्चाट ताकतीचे अफाट प्रयोग, जादूचे प्रयोग, ज्योतिषी, आरादि मंडळींची य़ेडाइचि स्तुती करणारी गाणी, लहान मुलांना आवडणारी आणि मोठ्या माणस...ाना परवडणारी खेळण्याची दुकाने, म्हणजे अगदी अबल वृद्धाना आनद देणारी भारतातील कोणत्याही गावाला अभिमान वाटावी अशी जत्रा.
या जत्रेत एके काळी एक अफाट गाजलेला प्रयोग "हाल्या भुसा खातो"! या प्रयोगाने पंचक्रोशी गाजवली होती असे अजूनही आमच्या गावातील वृद्ध मंडळी चवीने सांगतात. प्रयोगाला साजेल असा खूप मोठा मंडप टाकलेला, कोणत्याही तमाश्या तंबूला लाजवेल येवढा आणि खूप लाम्ब तंबू . बाहेर मोठा बोर्ड "हाल्या भुसा खातो " आणि स्पीकरवरून पुकारणारी, उत्साही मंडळी, प्रयोगाच्या प्रचाराची योग्य ती जबादारी संयोजकांनी घेतली होती, गाव गावात रंगी बेरंगी सजवलेली जीप प्रयोगा अगोदरच प्रचार करत फिरत होति. प्रयोगाचेच कार्यकर्ते लय भारी लय भारी म्हणून तोंडी प्रचार करत होते आणि प्रचार करताना दाखवत नव्हते कि ते पण त्यांचेच लोक आहेत.
फक्त पाच रुपये फक्त पाच रुपये "हाल्या भुसा खातो " आता तुमच्या गावात " मोठी मोठी राज्ये गाजवून , तिथे गाजलेले आणि लोकांच्या पसंतीस उतरलेले, "तिथल्या " लोकांच्या आयुष्यात चमत्कारी बदल करून, तुमचे आयुष्य बदलायला आलेला चमत्कारी कार्यक्रम. फक्त पाच रुपये. आसा जोरात प्रचार चालु. तिकिटे काढुन पाहायला रांग "फक्त पाचच" रुपये असल्यामुळे आबालवृद्धांची गर्दी. ह्या$$$$$$$$$$$$$$$$$ बाहेर रांग. एका वेळी एकच माणूस आत जाइल अशी व्यवस्थ. लांब पाठीमागून कार्यक्रम बघून आलेले लोक रांगेत उभ्या असणार्या लोकांची उस्तुकता वाढवत होते." लय भारीय लय भारीय बघूनच या " अश्या प्रतीक्रीया बघून आलेल्याकडुन मिळत होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवर तोबा गर्दी झाली होती. शेवटी आमच्या बारकू अण्णांनी गर्दीत रेटारेटी करून तिकिट मिळवले व येस्टित चढण्याचा अनुभव असल्यामुळे आता घुसण्याची संधी लगेच मिळाली. आत जाताच बारकू आणा आवाकाच झाले, हा खरच त्यांचे आयुष्य बदलवणारा खेळ होत. जो त्यांच्या कायम लक्ष्यात राहिला. आतमध्ये "एका दावणीला बांधलेला हाल्या (रेडा ) आणि त्याच्या समोर भूश्याची पाटी, हाल्या ऐटीत भुसा खात आहे". बारकू आण्णांनी थोबाडीत मारून घेतली आणि बाहेर येवून चालू केले लयच भारी खेळाय "हाल्या भुसा खातो " लोकांनो पैसे देवून बघा. तुमचे आयुष्याच बदलून जाइल. फक्त पाच रुपये "हाल्या भुसा खातो "