Wednesday, July 17, 2013

हाल्या भुसा खातो

जुन्या माणसांकडून ऐकलेली गोष्ट.
आमच्या गावाजवळ येरमाळा म्हणून येडाई या देवीचे तीर्थक्षेत्र म्हणावे असे ठिकाण आहे. दर वर्षी उन्हाळ्यात ह्या देवीच्या टेकडिवजा डोंगरावर मोठी जत्रा भरते. तमासे, चित्रपट ग्रहात न चालणारे मराठी चित्रपट, पाळणे, फुगे खेळणी , डोंबार्याचे पुळ्चाट ताकतीचे अफाट प्रयोग, जादूचे प्रयोग, ज्योतिषी, आरादि मंडळींची य़ेडाइचि स्तुती करणारी गाणी, लहान मुलांना आवडणारी आणि मोठ्या माणस...ाना परवडणारी खेळण्याची दुकाने, म्हणजे अगदी अबल वृद्धाना आनद देणारी भारतातील कोणत्याही गावाला अभिमान वाटावी अशी जत्रा.
या जत्रेत एके काळी एक अफाट गाजलेला प्रयोग "हाल्या भुसा खातो"! या प्रयोगाने पंचक्रोशी गाजवली होती असे अजूनही आमच्या गावातील वृद्ध मंडळी चवीने सांगतात. प्रयोगाला साजेल असा खूप मोठा मंडप टाकलेला, कोणत्याही तमाश्या तंबूला लाजवेल येवढा आणि खूप लाम्ब तंबू . बाहेर मोठा बोर्ड "हाल्या भुसा खातो " आणि स्पीकरवरून पुकारणारी, उत्साही मंडळी, प्रयोगाच्या प्रचाराची योग्य ती जबादारी संयोजकांनी घेतली होती, गाव गावात रंगी बेरंगी सजवलेली जीप प्रयोगा अगोदरच प्रचार करत फिरत होति. प्रयोगाचेच कार्यकर्ते लय भारी लय भारी म्हणून तोंडी प्रचार करत होते आणि प्रचार करताना दाखवत नव्हते कि ते पण त्यांचेच लोक आहेत.
फक्त पाच रुपये फक्त पाच रुपये "हाल्या भुसा खातो " आता तुमच्या गावात " मोठी मोठी राज्ये गाजवून , तिथे गाजलेले आणि लोकांच्या पसंतीस उतरलेले, "तिथल्या " लोकांच्या आयुष्यात चमत्कारी बदल करून, तुमचे आयुष्य बदलायला आलेला चमत्कारी कार्यक्रम. फक्त पाच रुपये. आसा जोरात प्रचार चालु. तिकिटे काढुन पाहायला रांग "फक्त पाचच" रुपये असल्यामुळे आबालवृद्धांची गर्दी. ह्या$$$$$$$$$$$$$$$$$ बाहेर रांग. एका वेळी एकच माणूस आत जाइल अशी व्यवस्थ. लांब पाठीमागून कार्यक्रम बघून आलेले लोक रांगेत उभ्या असणार्या लोकांची उस्तुकता वाढवत होते." लय भारीय लय भारीय बघूनच या " अश्या प्रतीक्रीया बघून आलेल्याकडुन मिळत होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवर तोबा गर्दी झाली होती. शेवटी आमच्या बारकू अण्णांनी गर्दीत रेटारेटी करून तिकिट मिळवले व येस्टित चढण्याचा अनुभव असल्यामुळे आता घुसण्याची संधी लगेच मिळाली. आत जाताच बारकू आणा आवाकाच झाले, हा खरच त्यांचे आयुष्य बदलवणारा खेळ होत. जो त्यांच्या कायम लक्ष्यात राहिला. आतमध्ये "एका दावणीला बांधलेला हाल्या (रेडा ) आणि त्याच्या समोर भूश्याची पाटी, हाल्या ऐटीत भुसा खात आहे". बारकू आण्णांनी थोबाडीत मारून घेतली आणि बाहेर येवून चालू केले लयच भारी खेळाय "हाल्या भुसा खातो " लोकांनो पैसे देवून बघा. तुमचे आयुष्याच बदलून जाइल. फक्त पाच रुपये "हाल्या भुसा खातो "

No comments:

Post a Comment