Wednesday, July 17, 2013

माझे गाव आणि गावचा विकास

गावच्या विकासाच्या बातम्या कानावर पडत होत्या, पण आज गावचा विकास याची देही याची डोळा पाहिला. म्हणजे ह्या वर्षी लक्ष्मी आयच्या देवळाला दहा लाख रुपये खर्च केला, गेल्या वर्षी वीस लाख केला होता, आता सगळीकडे स्ल्यापच आहे त्यामुळे एकाच वेळी चार चार लग्नाचे वऱ्हाड बसू शकते. उन्हाळ्यात गार गार हवा असते त्यामुळे डाव खेळणाऱ्या लोकांना पण त्रास होत नाही. पिचकाऱ्या मारायला उठायला लागून नये म्हणून एका कोपऱ्याल...ा लालच रंग दिलाय. तसेच मरिआयचे, खंडूबाचे , जोतिबाचे देवळाचे पण बांधकाम जोरात चालू आहे. आजी आमदाराने दोन लाख, खासदाराने ४ लाख, भावी आणि महात्वाकांशी आमदार खासदारांनी पाच पाच लाख देवून गावाच्या विकासात भरीव योगदान दिल्याचे पण कळले. ज्या भावी उमेदवाराने देवळाला पैसे दिले नाहीत त्या उमेदवाराला गावात प्रवेश करू द्यायचा नाही असा पुरोगामी ठराव ग्रामसभेने पास केला. गावची एकी जबराट. गावचे कारभारी गावच्या विकासाची वित्ताम्बात देत होते. गावच्या प्रत्येक नौकरदार माणसाने दोन दोन हजार द्यायचे ठरले आहे, मला पण म्हणाले, तुला पण आज जे काय मिळाले आहे ते लक्ष्मि आयच्या आशीर्वादानेच मिळाले आहे, "म्हणजे नौकरी ". मी पण तिच्या उपकाराची परत फेड करावी अशी त्यांची रास्त अपेक्श्या होति. नाहीतर लक्ष्मिआय लईच कडक हाय, आमची म्हातारी एकदा म्हणालेली आठवलं. गावात चकचकनारी देवळे बघितले कि गावातल्या प्रत्येक माणसाला गावाचा आभिमान वाटल्या शिवाय राहत नाहि. प्रवेश द्वाराशीच मादिरालये शोभेत आणखीच भर घालतात, जिथे फुग्यापासून, देशी पर्यंत आणि रमा पासून टीचर्स पर्यंत सगळेच उपलब्ध करून दिले जाते. अश्या दुष्काळी भागात चील्ल्ड पाण्य्याच्या बाटलीपासून बड्वयसर पर्यंत सगळे मिळते. रात्री अपरात्री बायकांना संडास, लघवी सारख्या तुच्च्या गोष्टीसाठी नदीला जायचे म्हटले तरी ह्या तळिरामनच्या सोबतीमुळे भीती वाटत नाहि. तो एक खूपच मोठा फायदा आहे ह्या मादिरालायांचा . घरात संडास हे आमच्या शानच्या खिलाप असल्यामुळे गावात शिरताच आपल्याला सुगंधाशी वोळख करून घ्यावी लागते त्याच्या विषयी चार गोष्टी सांगाल तर चार बुकं शिकून आम्हाला न्यान हेप्लु नकु अशी ताकीद मिळते. त्यामुळे आपल्याला पण गावाच्या विकासात सहभागी होण्यावाचून पर्याय रहात नाहि. आता विकासच होत असल्यामुळे तरुणांना गावात मदिरापान करणे अपमानास्पद वाटते त्यामुळे अश्या आसपासच्या गावातील तरुणांची व्यवस्था गावच्या आसपास तीन चार धाबे टाकून केली आहे. तिथे बसून कारभारी आपल्या आपल्या गावाची दिश्या ठरवतात. तिथे बसूनच दोन बाटल्या पोटात गेल्यावर एका अतिशय जबाबदार कार्यकर्त्याने एक महत्वाची सुचना मांडली - नवीन बांधलेल्या देवळात लग्नाच्या येळाला इटाळाच्या बाया येत असल्यामुळे देवीला इटाळ चांडाळ होत आहे त्यामुळे आता गावात नवीन मंगल कार्यालय होयालाच फायचेल. एक सेकंदात ह्या ह्या पाठ्य्याने ठरावाला अनुमोदन दिले आणि नवीन मंगल कार्यालयाचा ठराव मंजूर झाला, लगेच फोनवर वर्गणी बुकाची ओर्डर दिली, !!लक्ष्मिआय प्रसन्न!!

No comments:

Post a Comment