Thursday, July 25, 2013

कारखान्याच्या चाळीवर कामगारांच्या पोटाची भूक तर भागत नव्हती, पण त्यांच्या पारमार्थिक भुकेची गरज लक्ष्यात घेवून कारभार्यांनी सिमेंटच्या पत्र्याचे  देवूळ बांधून दिले होते. कामगारांच्या करमणुकीच्या साधनांची चिंता कारभाऱ्याना नव्हती, कारण त्यांच्याच  कार्यकर्त्यांनी न सांगता तिथे गावठी कसिनो (मटका केंद्रं आणि जुगार अड्डे ) उभारल्यामुळे कामगारांना  करमणुकीचे आणि पैसे कमावण्याचे साधन आपोआपच उपलब्ध झाले होते. देशी मदिरा म्हणजे हातभट्टीच्या दारूची मुलभूत गरज भागावी म्हणून सगळ्या कामगारांना उधार दारू मिळेल याची पण सोय करण्यात आली होति. अश्या तऱ्हेन सहकार चळवळीचा पाया म्हणजे कामगार आणि त्यांची कुटुंबे याची जीवापाड काळजी घेण्यासाठी कारभारी हमेशा जागरूक असत. फक्त पगार मागायचा नाही हि एकच अट होति. आणि ते कामगार जीवाला जीव देवून पाळत होते. हे लोक मोठ्या  साहेबाकडं म्हणजे दिल्लीच्या वाटेकडं रात्रंदिनी नजर दिवून असत. कारण हा मोठ्ठा साहेबच फक्त आपल्यासाठी कायतरी करणार अशी जबराट आश्या कामगार आणि कामगारांच्या लेकरा बाळांना असायचि.

आता येवढं  कामगारासाठी करुन् धरून अजून कामगारांच्या नुकत्याच मिसरुट फुटलेल्या , जवान झालेल्या आणि जवानी येवून गेलेल्या पोरासाठी पण कारभार्यांनी काय तरी करावे हि म्हणजे अति अपेक्श्या ठेवल्यासारखे होते. त्यामुळे ह्या पोरांनी स्वतःच एक तरुण मंडळ स्थापन केले होते. आणि ह्या तरुण मंडळाचे काम हे पत्र्याच्या बनवलेल्या इठ्ठल रुक्मिणी मंदिरातून चाले. काही पारमार्थिक लोकांचा संध्याकाळचा तीन तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम सोडला तर बाकीचे एकवीस तास हे देवूळ तरुण मंडळाच्या कब्ज्यात असे.

सकाळी ७ वाजता झोपेतून उठुन घरी गेले आणि अंघोळ चापानी करून आठ वाजता परत तरुण मंडळाचा कार्यक्रम चालू होत असे. दोन पत्त्याचे डाव, एक बुद्धिबळ आणि एक क्यारम. अश्या तऱ्हेन कधी पैश्यावर, कधी शेव चिवड्यावर, तर कधी चहा सिगरेटिवर व गाय छ्यापवर  डाव चालत. ह्या मंडळीमध्ये चावट, पाववाला, क्याप्टन, क्रोन्जे, टणक, गुडगा, इंजनेर, मास्तर  अशी आन्डील मंडळी होती आणि बाकी लिम्बुटिम्बु खुर्दा पण भरपूर होता.

दहा ते अकरा वाजता सकाळी यातील  एका दोघाची तरी आई देवळात यायचीच  अन आपल्या पोराला म्हणायची, " तुझा बाप कालपासून घरी आला नाही बघ तरी पोरा कुठं हाय ?

पोरगा, " घालू  दि आय मरू दि , तू जा घरी देवळात येत जावू नकु!
आई तिथल्या दुसर्या पोराला , "होय इंजनेर साहेब , मास्तर जरा  येतो का रं बघून त्यांना कालपासून आलं  न्हायतं ?
मास्तर, " मला माहिताय मामी, काल मामा टिग्याच्या दारूच्या दुकानात पडलं व्हतं उतरली कि येत्याल"

पण मित्राच्या आयचं  मन मोडायचा न्हाय म्हणून मास्तर डाव कुणाच्या तरी हातात देवून जायचा आणि त्याच्या मानलेल्या मामाला ढकलीत घरी घेवून यायचा. आसंच ठरलेलं होतं आपल्या बापाला आपण न्हाय आणायचं तर आपल्या मित्रानं आणायचा कारण त्यामुळे आपली इज्जत कमी जाते. तसा इज्जत जायचा सवाल लय कमी वेळा यायचा कारण पेत  कोण न्हाय हेच हुडकावं लागायचं.

पण चावट ह्याला लयच कंटाळला व्हता, त्याचा बाप जरा  जास्तच करायचा म्हणजे घरी कमी आणि दारूच्या अड्ड्यावर जास्त. तो एक दिवशी पोरांना म्हणाला टिग्याचा दारूचा कोटाच जाळू, सगळं दुकान जाळून टाकू बघू कोण काय उपटतय आपली, पोरांनी माना हलवल्या झोपी गेलि.  पंधरा दिवसांनी रात्री दोन वाजता पोरांनी एकमेकाला उठविले आणि लांबूनच मोठी आग दाखविली टीग्याचं दारूचं दुकान जळत व्हतं आणि चावट शेजारीच तोंडावर पांघरून घेवून झोपला व्हता. त्याची छ्याती मोठा मोठ्या श्वासो छ्वासाने हलत होती हे सगळ्यांनी बघितले आणि त्याला नाही उठविले.

आज पंधरा ते अठरा वर्ष नंतर चावटचि दोन पोरे त्याला तसाच दारूच्या दुकानावून घेवून येतात आता मालक बदललाय टिग्याच पोरगा हाय. परवा कळलं कि टिग्याच्या पोराचं दारूचं दुकान पण कुणीतरी जाळलं.
पण टिग्याचं पोरगं आता तिथं नवीन चिरेबंदी दुकान बांधणार हाय. बगू कोणता आयघाला आग लावतुय आता असं म्हन्तोय.
कारखाना तसाचय पडिक अवस्थेत, चाळी पण तस्याच आहेत,  भोसडा उदास झालाय फक्त कामगारांचा. कारखान्याच्या कारभार्यांनी आता सहकार सोडुन दुसरा खाजगी कारखाना काढलाय, कारभाऱ्याचं  लयच जोरात चालू हाय म्हणं आता त्याला मोठ्या साहेबाचा डायरेक्ट आशीर्वाद मिळालाय.
विना सहकार नाही उद्धार !



No comments:

Post a Comment