Monday, August 19, 2013

डान्स बार उर्फ स्वर्ग !

आम्ही मुंबईला जायला आणि डान्स बार वर आबा पाटलांनी बंदी आणल्याची दुख;द बातमी कानावर पडायला गाट पडली. गेल्या दहा वर्षापासून  बाळगलेली हि पण अजून एक महात्वाकांक्ष्या कधीच पूर्ण होणार नाही म्हणून अतीव दुख झाले. आता नेहमीप्रमाणे या पण दुक्खावर आक्शीर उतारा म्हणून सांच्याला  म्हाताऱ्या साधूला जवळ घेवून बसायची संधी मिळणार त्यामुळे आतल्या मनाने आतल्या आतच बागडायला पण चालू केलं होतं. या दुखाचं  वोझं घेवूनच ट्याक्सित बसलो अन भैय्याला ऑर्डर दिली "एल्फ़िन्सटन रोड".  जसजसं हे एल्फिन्स्टन रोड जवळ येत व्हतं तसं माझ्या काळजाचं  ठोकं वाढायला चालू झालं.

मी, "भैया आप रस्ता चूक गये  है, इस इलाके मी मेरा  दोस्त नही रह सकता"
भैया," नाही ना जी, येही ही है ना जी आपका का पता, सायोनारा बिल्डींग तीस माले कि हि है"

खानदेश्यातल्या एका गावातल्या आपल्या दोस्ताने अगरवाल, खटोडिया, गांधी, गिडवानी आश्या नावाच्या जमाती राहायच्या, त्या ठिकाणी फ़्ल्याट घेतलाय हे बघून ह्या मऱ्हाठी माणसाचा भरून आलेला उर आसपासच्या टपरी वाल्या, चहा वाल्या, ट्याक्सिवाल्या लोकांच्या नजरेतून सुटला नसावा. मी पिशवी घेवून ट्याक्सीतून उतरून त्या सायोनाराचं मजलं मोजायला चालू केलं आणि आपल्याकडून काय तरी चुकत आहे याची जाणीव होताच सरळ होवून चालू लागलो. आपलि भाषाच नाही तर हावभावाच पण साला आसं कि कुठं जरी गेलं तरी लोकं विचारतात "उस्मानाबादचा का ? ".
चालताना मला उगीचच भास झाला कि हे सगळे लोक एकमेकाला " लो और एक घाटी आ गया"  असं म्हणत आहेत.

गेटच्या दरवाज्यातून दोस्त घेवून जायला लागला तर वाचमनने उठुन सलाम ठोकला एखादा माणूस गोंधळून गेला असता पण मला पण आता थोडीशी सवय झालीय, मी जास्तच तोंड फुगावलं अन त्याच्याकडं दुर्लक्ष्य करून पुढं चालू लागलो. आपला वट वाढवायची हि पण एक स्टाइल असते. नाहीतर अगोदर मी अश्या वेळेला ओशाळल्यागत हसायचो मग तो वाच्मन आपली पुति ओळखून सोडायचा.

घरात माफ करा फ़्ल्याट मध्ये शिरताच एक  खूपच सुंदर अशी बुद्ध प्रतिमा दर्शनीच दिसली, मी तिथंच थबकलो आणि मित्राकडं प्रश्नार्थक नजरेनं बघितलं.
तो, " सतरा हजार रुपयांची!
मी, " आरे वाह मूर्ती तर सुंदर आणि छानच आहे पण तुझ्या घरी बुद्ध ?
तो , " आरे बाबा तुला कळणार नाही आम्ही  "इण्टलेक्च्वल" मध्ये मोडतो आता,  सुंदर आणि महागडी बुद्ध प्रतिमा घरी असल्याशिवाय ते स्टेटस मिळत नाही.

छ्यान छ्यान !

मी, "आरे पण माझं दुखः घालवायचं काय तर  कर,  थेरडा साधू तर पाहिजेच पाहिजे.
तो, " आरे मित्रा थेरडा साधू विसर आता, तुला मास्तरची आणलीय, दुक्खाचा किती आनंद भोगायचा तेवढा भोग! पण हि कोरीच हाणायची असते, हा घे बारका पिल्लू कप, सलग तीन कप, खप, खप, खप हाणू दोघं मिळुन. आसं छातीत जळा जळा करत गेलं कि  स्वर्गाच्या रस्त्यावर असल्याचा भास होतो आणि खाली आठच मिनिटात तुला शेट्टीच्या स्वर्गात पण घेवून जातो.

साला अजून कारा असल्यामुळं ह्याला काय पण परवडतं !

स्वर्गाच्या रस्त्याचा आनंद उपभोगत आम्ही सातच मिनिटात सायोनाराच्या खालीच असलेल्या शेट्टीच्या स्वर्गात दाखल.

साडेसातलाच गेल्यामुळे पहिले ग्राहक बनण्याचा मान आम्हालाच मिळाला होता. आतलं वातावरण म्हणजे साक्ष्यात स्वर्गाची कल्पना केल्या सारखं नव्हतं पण कमी पण नव्हतं.









No comments:

Post a Comment