Tuesday, August 13, 2013

मराठी साहित्य संमेलनाचा हेतू आणि उद्देश

मराठी साहित्य संमेलनाचा हेतू आणि उद्देश काय असावेत यावर सासवड येथे होत असणाऱ्या अ. भा. सा. संमेलनाच्या अध्यक्ष्यपदाचे उमेदवार श्री संजय सोनवणी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी उचललेले मुद्दे आणि माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या माणसाच्या अपेक्श्या मध्ये खूपच साधर्म्य आढळून आले. याच मुद्द्याचा उहापोह आतापर्यंतच्या साहित्य संमेलनामध्ये झाला असता आणि त्यावर खरेच कृती पण झाली असती तर या संम्मेलनाची कुणी करदात्याच्या पैस्यावर भरलेली लेखकांची आणि कवींची जत्रा म्हणून हेटाळणी केली नसती.

१. आताचे संमेलन हे विशिष्ट सामाज्याचेच प्रतिनिधित्व करते म्हणून बाकी बहुजन समाज्यातील लोकांना स्वतंत्र साहित्य संमेलने घेणे भाग पडते. सर्व विभागांना, समाज्याला, संस्कृतींना, बोली भाषांना ह्यात स्थान मिळावे म्हणून प्रयत्न करणे

२. ह्या संमेलनात आणि महाराष्ट्रभर गावामध्ये आणि लहान शहरामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्रे घडवून आणून त्या त्या भागातील विद्यार्थ्यांना आणि लोकांना बोलण्याची संधी देणे. तेच तेच लोक बोलत असल्याने नवीन कल्पनांचा आणि विषयांचा अभाव निर्माण झाल्याचा भास होत आहे. पण ते खरे नाही , कारण नवीन विषय आणि कल्पना खूप आहेत पण काही लोक त्या पुढे येवू नये म्हणून काम करत आहे.

२. खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या जगामध्ये जिथे समाज व्यवस्था हि बाजार व्यवस्था झाली आहे व नागरिक हे नागरिक नसून गिऱ्हाईक झाले आहेत अश्या वेळी मराठी भाषा, साहित्य आणि माणूस फक्त टिकून न राहता जिंकून पुढे कसा जाईल यावर उपाय शोधणे.

३. मराठी मध्ये दर्जेदार साहित्य निर्माण होण्यासाठी व जगातील उच्च साहित्यामध्ये मराठी साहित्याला स्थान मिळवून द्यायचे असेल तर उदयोन्मुख लेखकांना प्रोत्साहित करणे. म्हणजे एका जागी साचलेले पाणी वाहते होईल.

३. शिक्षणाचे बाजारीकरण आणि वरचे वर महागडे आणि गरीबाच्या अवाक्यातून दूर जाणारे शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी सरकारवर दबाव आणने.

या आणि अश्या इतर अनेक महत्वाच्या विषय उचलून संजय सोनवणी हे साहित्य संमेलनाची निवडणूक लढत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आमच्या लाख लाख शुभेछ्या.
आजच्या श्री संजय सोनवणी यांच्या वाढदिनादिवशी त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभो हीच सदिछ्या!

No comments:

Post a Comment