Thursday, May 12, 2016

सैराटणे काढला मराठी चित्रपट श्रुष्टीतील प्रस्थापितांच्या बुडाखाली जाळ

We can easily forgive a child who is afraid of the dark; real tragedy of life is when men are afraid of the light.
.
डीक्षण..........साहित्य , नाटक, सिनेमा मध्ये डीक्षण हि जी संकल्पना असते त्या संकल्पनेच्या आयला पठाण लाऊन बोली भाषा हीच खरी डीक्षण असते आणि साहित्याची किंवा चित्रपटाची वगैरे कोणतीही वेगळी भाषा नसते हे सिद्ध केले आणि मराठी सिनेमा मध्ये पहिली क्रांती आणली. क्लास निर्माण करण्यासाठी पुस्तकी भाषेत लिहायची गरज नसते पुस्तकी भाषेत सिनेमा करण्याची गरज नसते आणि गाणी सुद्धा अगदी ग्रामीण भाषेत लिहून गाऊन त्याला लोकगीत म्हणण्याऐवजी क्लास म्हणता येऊ शकते हे सिद्ध केले अजयअतुल यांनी.
सदाशिव पेठेत आणि शिवाजी पार्काच्या पाषाण खडकात अडकून पडलेल्या मराठी सिनेमा त्याने खडकावर जोरदार घन मारून उपाळ फोडलं आणि आता मराठी सिनेमाचा झरा अगदी निर्मळ पाण्याने भरून झुळू झुळू वाहिल्याशिवाय राहणर नाही.
मराठी सिनेमात ऊस, दाखवलाय, शेती दाखवलीय, ग्रामीण भाग दाखवलाय पण आजपर्यंत दिसणारे ते ढोंगी होतं असं वाटण्या इतकं सैराट मधील चित्रण वास्तववादि आहे. सिनेमात असतं तसं नसतं असं म्हणताना आपल्याला दहादा विचार करावा लागेल. जेंव्हा आपण पर्षाचे मित्र बघतो, कॉलेज मध्ये दुसऱ्याच वर्गात बसून प्राध्यापकाच्या कांठाळीत हाननारा उगवता नेता पाटलाचा पोरगा बघतो आणि बेंचवर एकांगी पडून पर्शाकडे बघणारी अर्ची बघतो. हे तिथंच थांबत नाही तर उगवत्या नेत्याची तक्रार करायला गेलेल्या प्राध्यापक मंडळीना जेव्हा त्याचा बाप जो कॉलेजचा संस्थापक असतो तो म्हणतो, सरांना वोळख करून द्या कोण कसं आहे आपल्या कॉलेज मध्ये कसं राहायचे आणि तिथंच बसलेला कार्यकर्ता जेव्हा उगवता नेता म्हणजे प्रिन्सच्या वाढदिवसासाठी त्याच प्राध्यापक मंडळीना वर्गणी जमा करायला सांगतो तेव्हा आपल्या शिक्षण व्यवस्थेला नागराज जोरात कानसुलीत मारतो.
चित्रपट इथून गती घेतो आणि परशाचे आणि अर्चीचे प्रेम वाढत जाते. हे प्रेम वाढताणाचा प्रवास मांडताना अर्चीचे पारशाच्या आईला, ‘कसं काय आत्या बराय का” हा प्रश्न विचारने म्हणजे आत्याच्या पोराला आत्येभाऊ म्हननारांची आणि आपली संकृती वेगळी आहे हे प्रकर्षाने जाणवते.
हि झाली एक बाजू. जेव्हा ह्यांना रंगे हाथ पकडले जाते तेव्हा परशाच्या मदतीला येणारा प्राध्यापक विचारतो, “झोपलाय ना तिच्याबरोबर देकी सोडून आता” ह्या डायलॉग मधून नागराजला दलित समाजातील बदला घेण्याची भावना तर दाखवायची नसेल ना? असे वाटते. ती तितकीच खरी असते.
गाणी, रोमांस लंगड्याचे दुकानदाराच्या पोरीवर लाईन मारणे यामुळे मला माझे बालपण आठवले. फक्त एका दुकादाराच्या पोरीला बाघायला मिळावे म्हणून मी एकदा दिवसातून पाच वेळा चुना पुडी आणायला गेलो होतो तेंव्हा तिची आई म्हणाली होती, “ किती चुना खातो रं इकास, का घराला देतोय?’ नंतर मी तिच्या दुकानाला कधीच गेलो नव्हतो. असो.
मध्यंतरा नंतर सिनेमा ग्रीप पकडतो आणि खऱ्या ड्राम्याला सुरुवात होते. इथपर्यंत लगेच समजून पण येते कि सुरुवातीला नवखे वाटणारे कलाकार आणि त्यांचा अभिनय आता मुरलेल्या सुपरस्टार सारखा वाटू लागतो. हैद्राबाद मध्ये झोपडपट्टी राहायला गेल्या नंतर,” इथं किडा मुंगी सारखं जगायचं का ?” असे जेव्हा अर्ची रडत रडत विचारते तेव्हा तिचा निश्चय ढासळतो कि काय असे वाटते पण नाही ती टिकते. तिचे प्रेम एवढे कच्चे नसते. जीवनाचा संघर्ष करताना स्टोव्ह घेऊन येणारा परशा बघून मला माझी आठवण झाली, मीपण असाच स्टोव्ह घेऊन आलो होतो. मला सोपे गेले कारण मला पाठींबा द्यायला लोक होते, माझा बाप साखर कारखान्याचा चेरमन नव्हता म्हणून माझ्यामागे पिस्तुल घेऊन लोक पाठवले नव्हते त्यामुळे परशा खरा हिरो वाटतो. पाटलाच्या पोरीला झाडून काढायचा त्रास होऊ नये म्हणून स्वतः झाडणारा, स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालणारा, एका गरीब प्रेम करणाऱ्या नवऱ्याची देहबोली जी पारशाने वठवली आहे त्याला तोड नाही. चित्रपट बघताना माझ्या डोक्यात कायम एक विचार होता, हा संबध फक्त जातीशी आहे का ? पारधी असलेला परशा म्हणून त्याला पाटलाचा विरोध आहे का ? तर तसं नाही. कारखान्याचा चेरमन असलेला कोणीही मराठा जर त्याच्या पोरीवर फाटक्या गरीब घरातील मराठा पोराने प्रेम केले असते तरी त्याच्या अंगावर हे लोक पिस्तुल घेऊन गेलेच असते. कारण तो पाटील सत्ताधारी आणि पैशाचा माज असलेला मराठा आहे आणि त्याच्या दिमतीला आमचे साहेब म्हणून हुजरे करणारे गरीब मराठा आहेत. त्याची पोरगी पळून गेली म्हणून सामान्य मराठ्याची इज्जत जाते पण गरीब मराठ्याची पोरगी पळून गेल्यावर त्या साखर कारखान्याच्या चेरमनची इज्जत जात नसते हे वास्तव आहे.
चित्रपट तेव्हा उंची गाठतो जेव्हा परशा अर्चीवर संशय घेतो आणि हैदराबादच्या रस्त्यावरून हे दोघे भांडत फिरत असतात. तेव्हा इमानदार असलेली अर्ची आणि बायकोवर संशय असलेला एक हतबल नवरा जेव्हा रस्त्यावर अगतिकपणे बसतो तेव्हा गावाकडे असताना पैलवान असलेला परशा आणि आता निम्मे वजन कमी होऊन हाडकुळा झालेला नवरा म्हणजेच खरा नटसम्राट. ह्याला इथे मोठे मोठे सवांद फेकून लोकांना जेरीस आणण्याची गरज पडत नाही.
सिनेमा बघताना कायम जाणवत राहतं कि नागराज मंजुळे यांनी शेक्सपियर कोळून पिलेला आहे.
“whole world is a stage and we are mere puppets in the hands of destiny “ दुखान्त हीच सर्वश्रेष्ठ कलाकृती समजली जाते हे नागराज यांना माहित असावे.
धक्कादायक शेवट करताना हिंसेचे स्वरूप कसे असते. Condemned, death race हे चित्रपट इंग्रजी मध्ये मला हिंसात्मक वाटतात. पण शेवटी लहान बाळ चालताना रक्ताचे पाउले उमटून दाखवली जाणारी हिंसा हि त्या हिंसेपेक्षा भयानक वाटली आणि हितं माझ्या डोळ्यात पाणी येताना मला कंट्रोल करताना माझी धांदल उडाली. मी सेन्सोर बोर्डवर वर असतो तर या चित्रपटाला ”A” हे प्रमाणपत्र दिले असते. (हे वाक्य दिग्दर्शकाने कोम्प्लीमेंट म्हणून घ्यावे)
शेवटी एक सांगतो. नागराजने गावगाडा ओळखला आहे, जातीव्यवस्था ओळखली आहे हेच त्याच गोष्टीवरून सिद्ध होते कि, पारधी असणारा पारश मराठ्याची पोरगी घेऊन पळून गेला तरी त्याची जात त्याच्या घरच्यांना जातीतून बहिष्कृत करते. भारतात जातीव्यवस्था टिकण्याचे हेच गमक आहे इथे उच्च पासून तथाकथित कनिष्ट पर्यंत सगळ्यांनाच जातीचा अभिमान आहे. आणि जात अशीच टिकून राहणार आहे हा भयंकर दुखदायक आत्मविश्वास माझ्यात निर्माण होतो.

2 comments:

  1. आपण आर्थिक अडचण माध्यमातून होणार आहेत तर किंवा आपण कोणत्याही आर्थिक गोंधळ आहेत अशा आर्थिक help.So म्हणून मदत करते, ख्रिश्चन संघटना गरजा लोकांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आहेत, आणि आपण निधी, आपल्या स्वत: च्या व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे आपण आर्थिक शोधत आहात कोणत्याही प्रकारची मदत? आम्ही एक खाजगी कर्ज टणक आर्थिक मदत इच्छा त्या सर्वांना निधी / कर्ज सर्व प्रकारच्या उपलब्ध आहेत. किंवा आपण adamsjohnloanfirm@hotmail.com बायबल "" म्हणतो Luke 11:10 जो कोणी विचारतो प्राप्त, ते हार्ड स्थानिक बँकांकडून राजधानी कर्ज प्राप्त करण्यासाठी शोधत आहेत; जो शोधतो; आणि दार वाजवतो होता त्याचे व्हावे, दार उघडले जाईल "म्हणून त्यांना मदत करण्यासाठी येथे होणार येशू काल, आज आणि अनंतकाळ more.Please या गंभीर मनाचे आणि देवाचे भय बाळगणारा लोक आहे कारण या संधी करून आपण पास करू नका, help.Email गरज कोण आहेत adamsjohnloanfirm@hotmail.com

    ReplyDelete
  2. आपण आर्थिक अडचण माध्यमातून होणार आहेत तर किंवा आपण कोणत्याही आर्थिक गोंधळ आहेत अशा आर्थिक help.So म्हणून मदत करते, ख्रिश्चन संघटना गरजा लोकांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आहेत, आणि आपण निधी, आपल्या स्वत: च्या व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे आपण आर्थिक शोधत आहात कोणत्याही प्रकारची मदत? आम्ही एक खाजगी कर्ज टणक आर्थिक मदत इच्छा त्या सर्वांना निधी / कर्ज सर्व प्रकारच्या उपलब्ध आहेत. किंवा आपण adamsjohnloanfirm@hotmail.com बायबल "" म्हणतो Luke 11:10 जो कोणी विचारतो प्राप्त, ते हार्ड स्थानिक बँकांकडून राजधानी कर्ज प्राप्त करण्यासाठी शोधत आहेत; जो शोधतो; आणि दार वाजवतो होता त्याचे व्हावे, दार उघडले जाईल "म्हणून त्यांना मदत करण्यासाठी येथे होणार येशू काल, आज आणि अनंतकाळ more.Please या गंभीर मनाचे आणि देवाचे भय बाळगणारा लोक आहे कारण या संधी करून आपण पास करू नका, help.Email गरज कोण आहेत adamsjohnloanfirm@hotmail.com

    ReplyDelete