Thursday, December 5, 2013

जुन्या मैत्रिणीचा शोध

खरं बोलायला काय त्यात. म्हणजे मी पण चार चौघासारखा आपल्या बारक्यापनिच्या, जरा मोठ्यापनीच्या आणि यंग्राट पणीच्या मैत्रिणी, वर्गमैत्रिणी आणि मनातल्या मनात लई वर्ष लाईन मारून ज्यांना माहित पण होवू दिलेले नाही अश्या पोरी फेसबुकवर शोधत असतो. अफाट प्रयत्ना नंतर एक सापडलीच. आणि ती पण एकदम जर्मनीत. हाय केला, वोळख करून दिली, गुरुजीचं नाव सांगितलं, शाळेचं नाव सांगितलं, तिने शाळेला खूपच नावं ठीवल्यालं तिचं जर्मन स्टाइल फोटो बघून सहन केलं. सगळ्यांच्या वोळखी करून झाल्या. तिला बरं वाटावं म्हणून तिचे वडिल खूपच मोठे साहेब होते असे पण बोललो.

शेवटी मुद्द्यवर येवून विचारले , मला ओळखते का ? आपण तिसरीत एकत्र होतो आणि शेजारीच बसायचो. तुला मी एकदोन/अबकडं काढून द्यायचो इत्यादी इत्यादी . . . . . .. "मी फक्त खबाल्याला ओळखते तू नाही माझ्या लक्ष्यात"
असे ऐकताच माझ्या डोक्यात मुंग्याच आल्या आणि आरदया सेकंदात तिला ब्लॉक केलं.

त्या खबाल्या का फ़िबाल्यानं आजून माझी पाठ सोडली नाही सापडू दे, हुडक्तोय त्याला पण फेसबुकावर!



No comments:

Post a Comment