Sunday, December 22, 2013

नरेंद्र मोदि आणि विकास

नोटांना गांधीजींच्या नोटा संबोधणे, गुजराती नेत्याला प्रमोट करून आणि गुजरात -महाराष्ट्र सीमा वाद उकरून काढणे व  गुजरात वर अन्याय झाला म्हणून गळा काढून अखंड हिंदुस्थानचे कारभारी बनायचे स्वप्न बघने हे तुमच्या खुज्या विचारसरणीचे द्योतक आहे.

गेल्या पंधरा वर्षातील गुजरात आणि महाराष्ट्रातील पोटापाण्यासाठी स्थलांतरित होणाऱ्या लोकांचा अभ्यास केला तर प्रकर्षाने जाणवेल कि गुजरात मधून महाराष्ट्रात नोकरी- धंद्यासाठी स्थलांतरित लोक हे महाराष्ट्रातून गुजरात मध्ये स्थलांतरित झालेल्या लोक पेक्ष्या दुपटीहून अधिक आहेत. हाच पुरावा आहे, पंधरा वर्षात सुद्धा तुमच्या विकास कामानी येवढि  रोजगार निर्मिती केली नाही जेवढी महाराष्ट्राच्या तुम्हाला वाटणाऱ्या नालायक लोकांनी केली.

एखाद्या प्रदेश्यातील विकासाची स्थिती - हि तेथील जन्म दर आणि मृत्यू दर यामधील प्रमाण, बालमृत्यूचे प्रमाण , स्त्रियांना मिळणार्या वैद्यकीय सुविधा, समाजातील सर्व स्तरा पर्यंत पोचलेले शिक्षण, महाविद्यालयांची संख्या, विजेचा वाढलेला खप, प्रत्याक्ष्यात उतरलेले गुंतवणुकीचे दावे, इतर राज्यातून झालेले स्थलांतर,  दरडोई उत्पन्न या आणि इतर अनेक घटकावरून ठरते.
वरील सर्व बाबतीत महाराष्ट्र, तामिळनाडू, NCR, कर्नाटका हे गुजरातच्या कित्तेक पटींनी पुढे आहेत. त्यामळे गुजरातच्या विकासाचे दावे हे पूर्णपणे खोटे आहेत व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारे आहेत.

बाकी महाराष्ट्रातील लेकरं बोलायला शिकली कि  पहिले शब्द असतात  शिवराय,  फुले, शाहू, आंबेडकर.  ते आम्हाला "शिवाजीला दरोडेखोर संबोधणाऱ्याकडुन  आणि  जनतेला भांडी घसा आमची म्हणणाऱ्याकडून   शिकायची गरज नाही"


No comments:

Post a Comment