Thursday, December 19, 2013

देवयानी खोब्रागडे आणि भारतीय मानसिकता

एक भारत सरकारची ग्याजेटेड महिला अधिकारी परदेशात कनिष्ठ राजदूत म्हणून जाते. आणि गृहीत धरूया तिच्याकडून अमेरिकेतल्या दिवाणी कायद्याचा भंग होतो. तेव्हा अमेरिकन अधिकाऱ्याचे कर्तव्य असते कि भारत सरकारच्या उच्च आधिकार्याना संपर्क करून ती बाब नजरेत आणून देणे आणि हे प्रकरण वैयक्तिक पातळीवर न आणता राजकीय शिष्टाचारानुसार सोडवणे. ते न करता तिला फौजदारी गुन्ह्या प्रमाणे रस्त्यावर अटक केली जाते, नागडे करून तपासले जाते आणि व्यसनी कैद्या सोबत एक रात्र कोठडीत डांबले जाते. यामध्ये आपण सगळ्या जगावर दादागिरी करू शकतो अश भावना असते.

हि गोष्ट ती भारतीय आहे, महिला आहे म्हणून निषेधार्य नाहीः तर ती भारताचे प्रतिनिधित्व करत असताना भारताच्या राजदूताला अशी वागणूक देणे म्हणजे भारत देशाची इज्जत जगाच्या वेशीवर टांगण्यासारखे आहे. याचा जर भारतातून कधी नव्हे तसा निषेध झाला असेल आणि सरकारने पण लगेच पावले उचलून कारवाई केली असेल तर भारत सरकारचे आणि जनतेचे अभिनंदनच करायला हवे. 

देवयानीच्या बाबतीत अमेरिका चुकीच्या वागली हे स्वता  अमेरिकी सरकारने कबुल करून माफी मागितली तरी सुद्धा काही कुजक्या मनोव्र्रुत्तीची  वृत्तपत्रे आणि लोक देवयानी बाई (बाई हा शब्द अनेक वेळा ) कशी चुकली हेच सिद्ध करण्यात आपली सगळी ताकत पनाला लावत आहेत. 

मी जेव्हा अमेरिकेतील प्रसार माध्यमावरील चर्चा पहिली तेव्हा अमेरिकी नागरिकांनी त्यांच्याच सरकारला धारेवर धरले आहे व अमेरिकी सरकार कसे चुकले याचे दाखले दिले आहेत. भारतातील चर्चा पहिली तर तिथे ती वैयक्तिक रित्या कशी चुकली आणि तिच्या बापाने काय केले होते तिचा "आदर्श " मध्ये कसा फ़्ल्याट होता याची चर्चा रंगत येत आहे. 

तिच्यावरची अमेरिकेतील कारवाई आणि तिने भारतात केले अजून न सिद्ध झालेले भ्रष्टाचार यांचा संबंध का लावला जात आहे. तसे असेल तर तिला भारतात बोलवून चौकशीच मागणी होवू शकते. 

तिच्यावर झालेल्या कारवाईचे भारताने खूप कडक उत्तर दिले हे भारतीयांच्याच पचनी पडले नाही हे समजायला कठीण आहे. काही स्वयंघोषित बुद्धिवादी लोक आपली बुद्धी देवयानीवर योग्य तीच कारवाई झाली हे सिद्ध करण्याकरिता आपली बुद्धी खर्च करत आहेत. त्यांना भारताने अमेरिकी दुतावासावर केलेली कारवाई सुद्धा निशेधार्या वाटते. आश्चर्य म्हणजे अमेरिकेला वाटत नाही.  

काही प्रश्न - 

प्रश्न १ - तिच्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप होते तर तिची चौकशी करायची सोडून तिला राजदूत म्हणून सरकारने का नेमले?

प्रश्न २ : एकदा राजदूत म्हणून नेमणूक केल्यावर भारत सरकारची आणि भारतीय जनतेची ती प्रतिनिधी होते तिला पूर्ण राजनैतिक संरक्षण देणे हे भारत सरकारचे काम नाही का ? ती भारतात किती जरी गुन्हेगार असली तरी ?

प्रश्न ३: भारत सरकारच्या प्रतिनिधीला अप्मानाप्साद वागणूक दिली तेव्हा त्या प्रतिनिधीवर भारतातच टीका होते तेव्हा भारतातील सर्व ग्यजेटेड  अधिकारी ते हवालदार यांच्या मालमत्तेची चौकशी केले तर काय आढळून येईल माहित नाही का ? 

प्रश्न ४: तिचा आदर्श मध्ये फ़्ल्य़ाट आहे म्हणून अमेरिकेत नागडे करून चौकशी केल्याचा तुम्ही अनदोस्तव साजरा करत आहात का? 

प्रश्न ५ : अब्दूल कलाम, खान , रामदेव बाबा यांना वाईट वागणूक दिली तेव्हा भारताने अशी तीव्र प्रत्कीर्या दिली नाही म्हणून इथून पुढे पण भारताने असेच शाम्बुळे धोरण कायम ठेवावे का ?







No comments:

Post a Comment