Saturday, November 30, 2013

मुलाखत 1

महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रतीबिम्बित्व उमटवण्याचा प्रयत्न  ह्या  काल्पनिक मुलाखतीच्या माध्यमातून
---------------------------------------------------------------------------------------------------------

मुलाखतीचे ठिकाण :महाराष्ट्रातील अनेक साहेबांपैकी एका साहेबांच्या शेतातील बंगला.
मुलाखत देणारे : राणारणजितराव सयाजीराव घोरपडे पाटील
मुलाखत घेणारी : मृदुला कुलकर्णी - बापट 

मृ. कु. बा.: तर राणारणजितजि………………। 
(पाठीमागून घोगरा पण जबराट आवाज) , "मालक म्हणत्यात, मालकास्नी सगळी लोकं मालकच म्हणत्यात"

मृ. कु. बा: (मागून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष्य करून ) तर रानारणजितजि, आपल्याला सव्वीसाव्या वर्षीच आमदार होण्याचे भाग्य लाभले, त्याबद्दल अभिनन्दन.

रा. घो. पा.: हे बघा तुमचं नाव कायाय ? मृदुला ? हं ! मृदुला, माझ्या रक्तातच राजकारण आहे. म्हणजे आमचे पणजोबा हे राजकारणात होते आणि आधुनिक महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे खूपच मोठे योगदान आहे. तसेच आमचे आजोळ हे मराठवाड्यातल्या देशमुख घराण्यातलेच. तिकडचे आजोबा पण राजकारणात होते आणि त्यांचे पण महाराष्ट्राच्या विकासात आणि इतिहासात मोठे योगदान आहे.

मजी बगा , राजकारणाचे बाळकडू मला लहानपणापासून दोन्हीकडून मिळाले. आजोबा दहा वर्ष आमदार होते, वडिल गेले पंचेवीस वर्ष आमदार आणि मंत्री असल्यामुळे राज्यकारभार कसा चालतो हे मी जवळून बघितले आहे. अगदी मोठ्या साहेबापासून ते थोरल्या काकापर्यंत आणि दिल्लीच्या म्याडमचे सुद्धा, सगळ्यांचे आशीर्वाद मला बालपणीच मिळाले.

मृ. कु. बा: वेगळ्या वेगळ्या पक्ष्याच्या सर्वोच्च नेत्याचे तुम्हाला आशीर्वाद मिळालेत तर ?

रा. घो. पा.: तर! हे बघा महाराष्ट्राच्या राजकारणात एक परंपरा आहे विरोध  फकस्त राजकारणात, बाकी सगळे दोस्तच आहेत. आणि आमच्या वडिलांचे विरोधी पक्ष्याशी पण कायम सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत.

मृ. कु. बा: वरच्या पातळीवर तुम्ही आणि विरोधी पक्ष्याचे मैत्रीचे संबंध असतात आणि जमिनीवरच्या कार्यकर्त्याला एकमेकाची डोकी फोडायला लावता असा आरोप होतो तुमच्यावर?

रा. घो. पा.: ते खोटय. साफ खोटंय. we are means, असे बघा कि आमचा फुले शाहू आंबेडकरांना मानणारा  पुरोगामी पक्ष्य आहे आणि साहेबांनी परवाच दिल्लीवरून सांगितले आहे कि विचारांची लढाई विचारांनीच लढा.

मृ. कु. बा: आता आमदार झाल्या नंतर तुमचे पुढचे ध्येय काय आहे?

रा. घो. पा: साहेबांनी स्वतः सांगितलंय निट काम कर, पुढच्या टर्मला सहकार नायतर महसुल तुझ्याकडंच. तुमी आमचे काम तर बघा ना! झेडपी, पंचायत समिती. ग्रामपंचायती, सोसायट्या, ब्यांका, कारखाने सगळे आमच्याकडच आहे. झालंचतर सूतगिरणी, शेतकरी खरेदी विक्री संघ, शेतकरी सहकारी बाझार. सगळे आहे आमच्या मतदारसंघात.

मृ. कु. बा: पण लोक तर म्हणतात कि तुमची घराणेशाही आहे , आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या  घरातील मंडळी किंवा नातेवायाकांचीच वर्णी लागते?

रा. घो. पा.: कोण म्हणतंय नाव सांगता का त्याचं ?

मृ. कु. बा: म्हणजे विरोधक असे म्हणतात!

रा. घो. पा.: कोण विरोधक ? जिह्यात तर आम्हाला विरोधकच न्हाय ? मुंबाय पुण्याच्या लोकांनी आमचा नाद करुनी हेच मी तुमच्या मार्फत अजून सांगतो त्यांना.

मृ. कु. बा:  तर दर्शकहो हे होते अमेरिकेहून आधुनिक शेतीचे शिक्षण घेवून सुद्धा महाराष्टाच्या सेवेसाठी परत येवून सव्वीसाव्या वर्षी आमदार झालेले आजच्या तरुणांचे आदर्श नेत्रुत्व.






No comments:

Post a Comment