Friday, November 22, 2013

पुस्तके आणि आम्ही

नवीन पुस्तक घेतले कि त्याला कवर घालून व्यवस्थित सांभाळणाऱ्याचा मला बारक्यापनापासून भलताच म्हणजे अगदी खानदानी दुष्मनी इतकाच रागाय. म्हणजे आमच्या वर्गातील काही पोरांची पुस्तके वर्ष्याच्या शेवटी जशी घेतली होती किंवा त्या पेक्ष्या नवीन दिसायची. आणि त्यामुळे ते आमच्या रागाची बळी ठरायची. 

आणि आम्ही बापाने पुस्तक आणले कि दुसरया दिवशी चालूच "माझे नाव एकवीस पानावर आहे, मग २१ पानावर - " माझे नाव ५ नंबर पानावर हाये" मग ५ पानावर " अभ्यास कर माकडा नावे काय शोधतोय" अशी कलाकृती तयार होत असे. एवढ्यावरच न भागता. गांधीजींना हिप्पी कट, सरोजिनी नाय़डुना मिश्या, "कोण पादले , मी पादलो " अश्या प्रकारची वाक्याने आमची पुस्तके सजलेली असत. अश्यात गुरुजीने जर पुस्तक मागितले तर गुरुजी बदड बदड बदडत आणि येवढा मार खावून पण आम्ही पुन्हा शाळेत हिरोसारखे फिरत असू. असला निर्ढावलेपना अंगात कुठुन आला होता कुणास ठावूक. पण वर्ष्याच्या शेवटी पहिल्या तीन नंबरात येवून अजून गुरुजीना तोंडात बोट घालायला लावायचे हे म्हणजे भलतेच भारी.


No comments:

Post a Comment