Monday, October 27, 2014

देवगिरी (दौलताबाद )

वास्तविक पाहता वेरुळ आणि देवगिरी किल्ला एका दिवसात बघून व्हावा . दोन्ही मध्ये अंतर फक्त २० किलोमिटरचे आहे. पण ज्याला खरच समजून घेत, तारीफ करत आणि टाइम मशीन मधून मागे प्रवास करत आनंद लुटायचा आहे त्यांनी दोन्ही स्थळांना स्वतंत्र दिवस द्यावा.

अकराव्या शतकात देवांच्या टेकड्यावर यादवांनी बांधलेला किल्ला म्हणजे देवगिरी. साधारण दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर मोहम्मद बिन तुघलक याने अनेक प्रयत्नानंतर हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव दौलताबाद ठेवले. दौलताबाद म्हणजे दौलतीचे आगार. त्याने भारताची राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली. अनेक वेळा भारताची राजधानी बनण्याचे भाग्य लाभालेला हा आजून बर्यापैकी सुस्थितीत असलेला भुईकोट किल्ला आहे. किल्ला आणि त्याची सुरक्षा काय असते आणि किती स्तराची आसते  किल्ल्याकडे पहिल्यावरून समजते. हा किल्ला पाहून कुणीपण विचार करेल कि हारणारा हा आळशी राजा असला पाहिजे नाहीतर एवढी सुरक्षा व्यवस्था भेदून किल्ला जिंकणे कठीण वाटते. पण कठीण गोष्टीच जिंकायला लोकांना आवडत असतील. नंतर हा किल्ला बहामनी साम्राज्यात आला, अहमदनगर च्या निजामापासून मराठ्यांनी पण यावर राज्य केले आहे. भारतातील कोणत्याही किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था फिकी पडेल अशी ह्या किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था अनेक वेळा तोडली गेली. सहा ते सात पदरी सुरक्षा व्यवस्था, तीन खंदके, भुलभुल्लया ज्यात अडकलेले सैनिक जिवंत सुटणे अश्यक्यच. किल्ल्यावर तोफा अजून तश्याच आहेत. अतिशय सुस्थितीत असलेला किल्ला आजून किती वर्ष सुस्थिती राहील हा प्रश्न विचारला तर बाहेरच भिंती पडु देत पण जे डोंगरात कोरून बांधले आहे ते तर अजून हजार वर्ष त्याच स्थितीत राहील. किल्ल्यावर सर्व धर्मीय राजांनी राज्य केल्यामुळे हिंदू, मुस्लिम धर्माच्या खुणा आढळतात पण बुद्धिस्ट आणि जैन धर्माच्या खुणा पण आढळतात. त्यावरील मंदिराची आणि मराठवाड्यात दिसणाऱ्या हेमाडपंती मंदिराची ठेवण एकाच पाहून आश्चर्य वाटते. आकराव्या शतकापासून तीच ठेवण. कोल्हापूरचे महलक्ष्मिचे मंदिर, आमच्या गावातील खंडोबाचे मंदिर  आणि किल्ल्यावर दिसणारी मंदिरे एकाच गवंड्याने बांधली असावीत असाव भास होतो

ह्याच किल्ल्यावर एकनाथ महाराजांचे गुरु श्री जनार्धन स्वामी यांनी समाधी घेतली आहे. गडाचे फोटो आपल्याल माझ्या लिखाणा पेक्षा जास्त बोलतील आणि अचूक माहिती देतील जर समजून घ्यायची असेल तर.













































































































No comments:

Post a Comment