Sunday, October 26, 2014

वेरुळ

अयशस्वी होण्यासाठी नियोजनाची गरज पडत नाही म्हणतात.  पण यशस्वी होण्यासाठी नियोजन लागतेच हा एक सर्वमान्य नियम आहे. बहुतेक सर्वमान्य नियम मला कधी लागू होत नसतील. कसलेही नियोजन नसताना रात्री दहा वाजता बायकोला म्हणालो औरंगाबादला जायचे आहे साडेदहाला दोन पिशव्या घेऊन घर सोडले. लहानपणी वेरूळ बघितले होते पण आता एका वेगळ्या दृष्टीतून बघायचे होते.  महाराष्ट्रात राहून अजिंठा वेरूळ, बीबी का मकबरा, आलमगीर औरंगजेबाची कबर, महान देवगिरी किल्ला ज्याला भारताची या  राजधानी बनण्याचा गौरव प्राप्त झाला बघितला नसेल तर आपण खूपच संसारिक आणि दुनियेशी  काही देणेघेणे नसलेले, आपले घर बरे आणि आपण बरे असे आनंदी जीवन जगणारे  इसम आहात असे समजावे. प्रपंच करून बाकीची उठाठेव करणाऱ्या लोकांपैकी मी स्वताला एक समजतो, म्हणून इतिहासात रमायला आवडते.


औरंगाबादहून देवगिरी किल्ला वीस किलोमिटर आणि तिथून पुढे वेरूळ चाळीस किलोमिटर. या लेन्यांचे काम इ. स. पूर्व सातव्या ते सहाव्या शतकात पूर्ण झाले, म्हणजे अजिंठ्या नंतर जवळ जवळ २०० वर्षांनी. असे म्हणतात कि हि लेणी  निर्माण करणारे अजंठा लेणी निर्माण करणाऱ्यांचे वंशज होते. अजिंठ्या प्रमाणे वेरूळ मध्ये पण रंगीत चित्रे चितारली गेली होती पण आता त्या चित्रांचे फक्त अस्तित्व दिसते. लेणी जरी विविध धर्मची असली तरी निर्मानामधील एकसूत्रता ह्यांचे निर्माण करते एकाच संस्कृतीतून आलेले वाटतात. लेण्यांची सुरुवात बुद्ध लेन्यापासून चालू होऊन ब्राह्मणी धर्माची स्थित्यंतरे दाखवून जैन श्राद्धामध्ये समाप्त होतात.

कैलाश मंदिर हा तर सुंदरतेचा आणि कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहे, आपण फोटो काढण्याच्या नादात सुंदरतेची अनुभूती घ्यायला विसरून जातो. १५०० वर्षापूर्वी राजांनी आणि लोकांनी आपल्या धर्मावर श्रद्धा दाखवण्यासाठी आणि प्रसार करण्यासाठी जाणीवपूर्वक चितारलेल्या ह्या अजरामर कलाकृती. त्याकाळी राजेशाही असल्याने कुणी प्रश्न विचारले नसतील कि राज्यात कितीतरी लोक उपाशी झोपत असताना सरकार हे लेण्यावर का पैसे खर्च करत आहे, हे सरकार गरीब विरोधी आहे ह्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. लोकशाही नसल्याने ह्या कलाकृती शक्य झाल्या असाव्यात. आज लोकशाही आल्यावर तरी कुठे समाज  भूकमुत्क  झालाय ?

 वेरुळच्या कैलाश मंदिरावर  अशोक स्तंभावर असलेल्या चार सिंहाच्या मूर्ती आपल्याला चक्रावून टाकतात.








कैलाश मंदिराचा पाया म्हणजे कल्पनाशक्तीचा कळस. हे पूर्ण मंदिर अनेक हत्तींनी मिळुन आपल्या पाठीवर पेललेले आहे हि कल्पना. संपूर्ण मंदिरामध्ये हत्ती आणि सिंह या प्राण्यांना दिले गेलेले महत्व ह्या प्राण्याचे भारतीय संस्कृतीत असलेले महत्व दर्शवते. 





कैलाश मंदिरावर चित्रांच्या आणि मूर्त्यांच्या माध्यमातून पुराणातील अनेक कथा साकारण्यात आल्या आहेत. 



त्याकाळी सुद्धा गणपतीचे अस्तित्व होतेच.



गजलक्ष्मि चा अभिषेक करताना हत्ती. पण लक्ष्मिचे हात तिच्या स्तनावर का दाखविले असतील ?






वेरूळची लेणी सुद्धा रंगीत होती. आता संगाचे फक्त अस्तित्व जाणवते.



देव आणि राजेलोकांच्या गर्दीत खूपच अपवादात्मक सामान्य लोकांच्या प्रतिकृती दिसतात. दोन्ही बाजूला फेटेधारी लोकांनी माझे लक्ष वेधून घेतले.





कैलाश मंदिराच्या छतावरील नक्षिकाम.





Sex was not a bad word, it seems






साहेब थकले.  दिवाळीला दोस्त फटाके उडवत असताना आपण कुठे डोंगरात फिरत आहोत हे भाव.


रावानाने कैलाश हलवल्याचे दृश्य. 


काही रोम्यांटिक क्षण.




रामायण

खालील तीन फोटो एकाच सभेतील आहे. सगळ्या स्त्रिया कडेने बसलेल्या आहेत. मधेच गणपती फक्त सभ्य पणे दिसतो.


आणि शेवटी ह्या स्त्रियांनी पुरुषांना आपल्या पायाखाली चेंगरले आहे. चेंगरलेले पुरुष नग्न आहेत. उजवीकडे विद्रूप तोंडाची आणि आपल्या फासळ्या बाहेर आलेली स्त्री कोण असेल ? आणि तिने दोन तीन पुरुषांना आपल्या पायाखाली,कमरेखाली दाबून का ठेवले असेल ?









No comments:

Post a Comment