Sunday, October 26, 2014

आलमगीर औरंगजेब

खुलताबाद इथे आलमगीर औरंगजेब याची समाधी (कबर ) आहे. त्याचा मृत्यू १७०७ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी अहमदनगर इथे झाला. त्याच्या शेवटच्या इच्छे नुसार त्याचा देह खुलताबाद इथे त्याच्या गुरु शेजारी दफन केला गेला. अतिशय साधी असलेली कबर हिच्यावर छत नाही. आपला देह हा उन पाउस या गोष्टीपासून झाकलेला नसू नये हि त्याची इछ्या. ह्या कबरीसाठी त्याच्या सरकारी खजिन्यातील एक रुपयाही खर्च केलेला नाही. त्याने टोप्या विणून आणि कुराण लिहून कमावलेल्या पैस्याने ह्या छोट्याश्या कबरीचे काम केले. राज्यातील एकहि पैसा स्वतासाठी न वापरणारा राजा महानच म्हणायचा. अर्ध्या आशिया खंडात नाव गाजवणारा राजा शेवटी महाराष्ट्रात हरलाच. कारण इथे त्याचे शत्रुत्व पण तस्याच एका निस्वार्थी राजाशी होते. त्याच्या कबरीशेजारी उभे राहताना कोणत्याही संवेदनशील माणसाला एक महान अनुभूती मिळते. साक्षात आलमगीर शेजारी उभे राहण्याचे भाग्य.

1 comment:

  1. चुकुन अहमदनगर झाले आहे काय ? सर

    ReplyDelete