Sunday, May 20, 2012

अजिन्ठा - समीक्षया

आजिन्ठा - एक अतिशय सुंदर संगीतमय पर्वणी आहे नितिन देसैईनी अगड़ी आत्मा वोतून ही कलाकृति निर्माण केली आहे. 
सुरुवात अतिशय भव्या वाटते आनी आपल्या चित्रपतकडौन अपेक्षया वाढतात. पण चित्रपतला मागे वोढन्यचे काम केले आहे ते त्यातील संवाद , संवाद फेक यानी. सगाळेच कलाकार पुनेरी आदिवासी भाषेत बोलतात . काही ठिकाणी आदीवाशी तरुणीच्या तोन्डि असे शब्द दिले आहेत की ते ऐकून संवाद लेखकाची आनी दिगदर्शकची दया येते. असे देवूळ आणि जोगवा मध्ये कधीच जाणवत नाही त्यामुळे तुलना हि होणारच. 
मध्यंतराच्या अगोदर दिग्दर्शक गाण्याशिवाय आणि संगीताशिवाय प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अयाशाश्वी ठरला आहे त्यामुळे काही त्रूटी प्रकार्ष्याने जाणवतात. पण भव्यता आणि फोटोग्राफी ह्या जमेच्या बाजू आहेत. त्यातच दिग्दर्शकाला भारतीय संस्कृती २००० वर्ष गुलाम असली तरी कशी श्रेष्ट आहे हे सांगण्याचा मोह आवरत नाही. त्यावेळी हा न्यून गन्द्तेतून आलेला अहंकार वाटतो .....पंडित हि व्यक्तिरेखा अशी दाखवली आहे कि त्याला जगातल्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान आहे, आणि ते तो लोकांच्या तोंडावर फेकून मारायला कायम तयार असतो. बिल साहेबा बरोबरच पंडितजींचा संवाद चित्रपटाला नीचांकी पातळीवर घेवून जातो तर चित्रपटाचे संगीत आणि शेवटचे गाणे हि उच्चांकी पातली आहे. 
वरती सांगितल्या प्रमाणे संगीत, गाणी, भव्यता ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत तर संवाद ऐकताना खरेच वाटते कि "बुद्धं सरणं गच्च्यामी" 
चित्रपट नक्की पहा मी ३.५ चांदण्या देईल